News

कर्नाटकमधील बेंगलोर शहरातील ताज बेंगलोर विमानतळावर WIZ द्वारे कोल्ड चेन अनब्रोकन कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय. हा कार्यक्रम भारताच्या कोल्ड चेन उद्योगासाठी महत्त्वाचा आहे.

Updated on 15 September, 2023 3:30 PM IST

कर्नाटकमधील बेंगलोर शहरातील ताज बेंगलोर विमानतळावर WIZ द्वारे कोल्ड चेन अनब्रोकन कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय. हा कार्यक्रम भारताच्या कोल्ड चेन उद्योगासाठी महत्त्वाचा आहे. औषध,अन्न, तंत्रज्ञान आणि इतर विविध बाबीवर चर्चा करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलंय.

या कार्यक्रमाचे उद्घाटन एयर फ्रेट एंड फार्मा, विज फ्रेटचे ग्लोबल हेड सतीश लक्कराजू, बेंगलोर इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडचे व्यवसाय उपाध्यक्ष रवीन पिंटो यांच्या हस्ते करण्यात आलंय. या कार्यक्रमात कृषी जागरण माध्यम समूह देखील सहभागी झालाय. तसंच कृषी जागरणचे संस्थापक आणि मुख्य संपादक एम.सी. डॉमिनिक यांनी कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून हजेरी लावलीय. तसंच या कार्यक्रमात अनेक विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आलीय.

कोल्ड चेन अनब्रोकन परिषदेचे १४ आणि १५ सप्टेंबर रोजी ताज बेंगळुरू येथे आयोजन करण्यात आले आहे. उद्योगातील संबंधितांना भेटण्यासाठी आणि उद्योगातील समस्यांवर चर्चा करण्यासाठी हे व्यासपीठ आहे. या वर्षी या कार्यक्रमाचे आयोजन दोन दिवस करण्यात आले आहे. यातून भागधारकांसाठी एक उत्कृष्ट ज्ञान-शेअरिंग आणि नेटवर्किंग संधी उपलब्ध होते.

English Summary: Organized Cold Chain Unbroken program in Bangalore
Published on: 15 September 2023, 03:30 IST