News

पुणे: महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, पराशर कृषी पर्यटन केंद्र आणि 'कृषी पर्यटन विश्व' यांच्या संयुक्त विद्यमाने, दोन दिवसीय कृषी पर्यटन कार्यशाळेचे आयोजन 'पराशर कृषी पर्यटन केंद्र', राजूरी (आळेफाटा, नाशिक रोड, पुणे) येथे करण्यात आले आहे. शेतीला पुरक व्यवसाय म्हणून कृषी पर्यटन मोठ्या प्रमाणात वाढत आहे. राज्यातील कृषी व ग्रामीण पर्यटन वृद्धीसाठी कृषी पर्यटन विश्व प्रयत्न करत आहे. याचाच एक भाग म्हणून या कार्यशाळेचे आयोजन केले आहे.

Updated on 05 March, 2019 7:08 AM IST


पुणे:
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, पराशर कृषी पर्यटन केंद्र आणि 'कृषी पर्यटन विश्व' यांच्या संयुक्त विद्यमाने, दोन दिवसीय कृषी पर्यटन कार्यशाळेचे आयोजन 'पराशर कृषी पर्यटन केंद्र', राजूरी (आळेफाटा, नाशिक रोड, पुणे) येथे करण्यात आले आहे. शेतीला पुरक व्यवसाय म्हणून कृषी पर्यटन मोठ्या प्रमाणात वाढत आहे. राज्यातील कृषी व ग्रामीण पर्यटन वृद्धीसाठी कृषी पर्यटन विश्व प्रयत्न करत आहे. याचाच एक भाग म्हणून या कार्यशाळेचे आयोजन केले आहे.

दोन दिवसीय कार्यशाळेत कृषी पर्यटन संकल्पना, केंद्र उभारणी, व्यवस्थापन भविष्य आणि डिजिटल मार्केटिंग, जाहिराती, सोशल मीडिया या महत्वाच्या गोष्टीचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या कार्यशाळेसाठी सशुल्क नोंदणी 7 मार्चच्या आधी करणे आवश्यक आहे. ही कार्यशाळा दिनांक 9 आणि 10 मार्च 2019 रोजी पराशर कृषी पर्यटन केंद्र, राजूरी, आळेफाटा, नाशिक रोड, पुणे येथे होणार आहे.   

इच्छुक शेतकरी व इतर व्यावसायिक मंडळींना, कृषी पर्यटन संकल्पना समजावी. कृषी पर्यटनाची संकल्पना तसेच कृषी पर्यटन केंद्र उभारणीसाठीचे लागणारी माहिती या कार्यशाळेत देण्यात येणार आहे. नव्याने कृषी पर्यटन केंद्र सुरू करणाऱ्या लोकांना या कार्यळाचे उपयोग नक्कीच होईल. असे कृषी पर्यटन विश्वचे संचालक गणेश चप्पलवार यांनी सांगितले. 

या कार्यशाळेत श्री. दिपक हरणे (विभागीय अधिकारी, एमटीडीसी, पुणे विभाग), श्री. सचिन म्हस्के (शाखा प्रबंधक, आयडीबीआय बँक), श्री. शशिकांत जाधव (संचालक, आमंत्रण कृषी पर्यटन), श्री. मनोज हाडवळे (संचालक, पराशर कृषी पर्यटन), श्री. गणेश चप्पलवार (संचालक, कृषी पर्यटन विश्व पुणे) इत्यादी तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.

English Summary: Organized Agriculture Tourism Workshop on 9-10 March at Rajuri, Junnar
Published on: 04 March 2019, 05:07 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)