News

कृषी विभागामार्फत रब्बी हंगाम सन 2023 मध्ये सर्वसाधारण आणि आदिवासी गटासाठी पीक स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. ज्वारी, गहू, हरभरा, करडई जवस या पिकांसाठी ही पीक स्पर्धा आयोजित केली आहे. राज्यात पिकांची उत्पादकता वाढवण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येत असतात. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत गौरव करुन प्रोत्साहन देण्यासाठी पीक स्पर्धा राबवल्या जातात. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 31 डिसेंबर 2023 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आलं आहे.

Updated on 02 November, 2023 11:14 AM IST

पीक स्पर्धेत भाग सहभागी होण्यासाठी पात्रता -
शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावावर जमीन असावी
शेती स्वत: कसत असावा
एकापेक्षा जास्त पिकांसाठी स्पर्धेत भाग घेता येईल
पिकाची किमान 40 आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक

प्रवेश शुल्क -
सर्वसाधारण गट - 300 रुपये
आदिवासी गट - 150 रुपये

अर्ज करण्याची अंतिम तारीख -
31 डिसेंबर 2023

कागदपत्रे -
अर्जासोबत विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र-अ)
प्रवेश शुल्क भरल्याचे चलन
७/१२, ८-अ चा उतारा
आदिवासी असल्यास जात प्रमाणपत्र
७/१२ वरील चिन्हांकित केलेला नकाशा
बँक खात्याच्या चेक/पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॅाक्स

तालुका पातळीवर बक्षीसे -
प्रथम क्रमांक - पाच हजार
द्वितीय क्रमांक - तीन हजार
तृतीय क्रमांक - दोन हजार

जिल्हा पातळीवर बक्षीसे -
प्रथम क्रमांक - 10 हजार
द्वितीय क्रमांक - 7 हजार
तृतीय क्रमांक - 5 हजार रुपये

राज्य पातळीवर बक्षीसे -
प्रथम क्रमांक - 50 हजार
द्वितीय क्रमांक - 40 हजार
तृतीय क्रमांक - 30 हजार रुपये

या योजनेबाबत अधिक माहितीसाठी -
पीक स्पर्धेच्या संदर्भात अधिक माहिती हवी असल्यास https://krishi.maharashtra.gov.in या कृषी विभागाच्या संकेतस्थळावर किंवा संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण) दिलीप झेंडे यांनी केले आहे.

English Summary: Organization of crop competition for farmers through Agriculture Department Know the rules
Published on: 02 November 2023, 11:14 IST