News

कमी वेळेत जास्त उत्पादन आणि उत्पन्न मिळवण्याच्या हेतूने मोठ्या प्रमाणात शेतकरी हायब्रीड बियाणांची लागवड करून उत्पन्न घेत आहेत.त्यातून त्यांना कमी वेळेत उत्पन्न सुद्धा चांगले मिळत आहे. परंतु हे हायब्रीड पीक आणि धान्य आपल्यासाठी फायदेशीर नाहीत. देशी धान्य आणि हायब्रीड या मध्ये बराच मोठा फरक आहे.त्याचबरोबर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे जमिनीचा कस सुद्धा मोठ्या प्रमाणात कमी होऊन जमिनी नापीक होत चालल्या आहेत. तसेच रासायनिक खतांच्या वापरामुळे त्याचा परिणाम हा मानवी आरोग्यावर मोठ्या प्रमाणात होत आहे.

Updated on 13 November, 2021 10:12 AM IST

स्वतःच्या आरोग्यासाठी सेंद्रिय शेती :

तसेच आधुनिक आणि हायब्रीड बियाणांमुळे पारंपरिक बियाणांच्या जाती संपुष्टात येऊ लागल्या आहेत या साठी सामाजिक बांधिलकी  तसेच  पर्यावरणासाठी  आणि  स्वतःच्या  आरोग्यासाठी सेंद्रिय शेती करणे काळाची गरज आहे.वाढता रासायनिक खतांचा वापर तसेच कीटकनाशकांच्या  फवारण्या  मोठ्या  प्रमाणात वाढलेल्या आपल्याला दिसून येत आहे. या औषधांचा  अंश आपल्याला फळे धान्य आणि भाजीपाला यामधून दिसून येत आहे.

याचा मोठ्या प्रमाणात परिणाम हा मानवी शरीर आणि पाळीव प्राण्यांवर होत आहे. तसेच रासायनिक खते आणि हायब्रीड धान्य या मुळे कॅन्सर चे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे. तसेच रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे शेतजमीन, पाणी, हवा व परिसर यांचे सुद्धा नुकसान मोठ्या प्रमाणात करतो. या मुळे जर का यातून स्वतःचे आणि पर्यावरणाचे संरक्षण करायचे असेल तर सेंद्रिय शेती करणे गरजेचे आहे. ज्या शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचे महत्व समजले आहे त्यांनी सेंद्रिय शेतीला सुरवात सुद्धा केली आहे.सर्व देशात आता सेंद्रिय शेतीला प्राधान्य देत आहे. तसेच सेंद्रिय पद्धतीने पिकवले अन्नधान्य, फळे, भाजीपाला यांना बाजारात सुद्धा मोठी मागणी आहे. आणि इतर च्या तुलनेत सेंद्रिय पालेभाज्या आणि फळभाज्यांचे भाव सुद्धा जास्त आहेत.

सेंद्रिय शेतीचे फायदे:-

1)उत्पादन खर्च कमी होऊन,फायदेशीर शेती करता येते.

2)जमिनीचा कस कमी होत नाही तसेच जमीन नापीक होण्यापासून बचावते.

3)खते आणि कीटकनाशके यांच्या वापरात घट होते.

4) रानातील पालापाचोळा, पाचट यामुळे जमिनीचा कस वाढतो आणि रासायनिक खतांचा वापर कमी होतो.

5) मानवी आरोग्यास फायदेशीर ठरते.

त्यामुळे येणारा काळ हा सेंद्रिय शेतीचा काळ आहे तसेच सेंद्रिय शेती करणे काळाची गरज आहे.

English Summary: Organic farming needs time, good effect on health
Published on: 13 November 2021, 10:12 IST