News

जनांवरांमध्येही काही वैशिष्ट असतात ज्यामुळे त्यांना ओळखणं सोपं जात. चोरी झालेल्या म्हशीवर देखील त्या खुणा आहेत. म्हशीच्या डाव्या पायावर एक खूण व शेपटीचा शेवटचा भाग सफेद आहे.

Updated on 06 June, 2022 10:41 AM IST

आपल्या आजूबाजूला कितीतरी अचंबित करणाऱ्या घटना घडत असतात. उत्तर प्रदेशमध्ये असाच काहीसा प्रसंग ओढवला आहे. म्हशीचा खरा मालक नक्की कोण आहे यासाठी पोलीस तपास करत होते मात्र पोलिसांना यात यश आलं नाही. शेवटी जिल्ह्याचे एसपी शामली सुकिर्ती माधव यांनी म्हशीची DNA चाचणी करण्याची सूचना जारी केली.

ही DNA चाचणी दोन वर्षांपूर्वी चोरी झालेल्या म्हशीच्या खऱ्या मालकाला शोधण्यासाठी केली जाणार आहे. त्यासाठी चोरी झालेल्या म्हशीला जन्म देणाऱ्या म्हशीचं DNA सॅम्पल घेतलं आहे. आणि आता हे सॅम्पल राज्याबाहेरील प्रयोगशाळेत पाठवले जाणार आहे. अहमदगड गावात राहणारे चंद्रपाल कश्यप यांची म्हैस चोरी करण्यात आली होती. चंद्रपाल यांच्या घरातून २५ ऑगस्ट २०२० रोजी म्हशीची चोरी केली होती.


त्यानंतर त्यांनी म्हशीचा खूप शोध घेतला. शेवटी त्यांना सहारनपूरच्या बीनपूर गावात सतबीर सिंह यांच्या घरी आपली हरवलेली म्हैस सापडली. मात्र सतबीर सिंह यांनी ती आपलीच म्हैस असल्याचं म्हटलं आहे. त्यानंतर कोरोनामुळे कायदेशीर प्रक्रियेला विलंब झाला. एसपी शामली सुकिर्ती माधव यांनी म्हशीच्या खऱ्या मालकाला शोधण्यासाठी DNA चाचणी करण्याचा करण्याचा निर्णय घेतला असून या प्रक्रियेला सुरुवातदेखील झाली आहे. तक्रारदार चंद्रपाल यांचे असे म्हणणे आहे की, चोरी झालेल्या म्हशीला जन्म देणारी आई आजही त्यांच्याकडे आहे.

शिवाय जनांवरांमध्येही काही वैशिष्ट असतात ज्यामुळे त्यांना ओळखणं सोपं जात. चोरी झालेल्या म्हशीवर देखील त्या खुणा आहेत. म्हशीच्या डाव्या पायावर एक खूण व शेपटीचा शेवटचा भाग सफेद आहे. तसेच प्राण्यांची स्मरणशक्तीही चांगली असते. मी जेव्हा म्हशीकडे गेलो तेव्हा तिने मला लगेच ओळखल्याचं त्यानं सांगितलं.

Electric Scooter: एकदा चार्ज केली की 120 किमी धावते ही इलेक्ट्रिक स्कूटर; जाणुन घ्या किंमत आणि फिचर्स 

पुढं तो असंही म्हणाला, DNA चाचणी नंतर हे सिद्ध होईल की, ती म्हैस माझीच आहे. त्यामुळे एसपी सुकिर्ती माधव यांच्या सूचनेनंतर पोलिसांसह पशु डॉक्टरांची टीम अहमदगड आणि बीनपूर गावात पोहचली. आता या दोन्ही म्हशींचा DNA चाचणी सॅम्पल घेण्यात आला आहे. त्यामुळे म्हशीचा खरा मालक कोण आहे हे DNA चाचणी नंतर समोर येईल. मात्र सध्या या घटनेची सर्वत्र चर्चा सुरु आहे.

महत्वाच्या बातम्या:
Mansoon: मान्सूनबाबत हवामान विभागाचा नवीन अंदाज आला, वाचा काय म्हटलं हवामान विभागानं 
Pm Awas Yojana 2022: प्रधानमंत्री आवास योजनेच्या नवीन यादीत तुमचे नाव आले की नाही? याप्रमाणे तपासा 

English Summary: Ordered DNA testing to find the real owner of the buffalo
Published on: 06 June 2022, 10:41 IST