News

नागपूर -शेतकरी हिताचे कारण पुढे करून राज्याचा महसूल वाढवा म्हणून सुपर मार्केट व किराणा दुकानात वाईन

Updated on 16 February, 2022 1:59 PM IST

नागपूर -शेतकरी हिताचे कारण पुढे करून राज्याचा महसूल वाढवा म्हणून सुपर मार्केट व किराणा दुकानात वाईन विक्रीच्या घेतलेल्या निर्णया विरोधात जीवन आधार फाऊंडेशन रेस्क्यू फोर्स महाराष्ट्र राज्य ने रोष व्यक्त केला आहे. 

महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज, संत गाडगे महाराज, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेव्श्वर महाराज अशा विविध संतांनी समाज निर्व्यसनी व्हावा यासाठी हाल अपेष्ठा सहन करून अभंग व किर्तनातून समाज प्रबोधन केले. तेव्हा महाराष्ट्र राज्याला व्यसन मुक्त राज्य करण्यासाठी तरुणांना व्यसनापासून परावृत्त 

करण्यासाठी विविध योजना व कार्यक्रम आखणे अपेक्षित होते. पण असे काहीही न करता या उलट शासनाचा महसूल वाढवण्याच्या हेतूने व काही वाईनरीज मालकाच्या हिताच्या दृष्टीने शेतकरी हिताचे कारण पुढे करून १०० चौ.फुटाचे सुपर मार्केट व किराणा दुकानात वाईन (मराठी अर्थ ‘दारू’) विक्रीचा निर्णय महाराष्ट्र मंत्री मंडळाने (बैठक क्रमांक ९८) दिनांक २७ जानेवारी २०२२ ला घेतलेला आहे. 

सदर निर्णयामुळे रोजगार मागणाऱ्या वैफल्य ग्रस्त तरुणाच्या हातात वाईन (मराठी अर्थ ‘दारू’) सहजरीत्या उपलब्ध करून दिल्या जाईल. 

 ज्यामुळे समाजात गुंडप्रवृत्ती वाढून अराजकता निर्माण होईल. या निर्णयामुळे शहर व ग्रामीण भागात गुन्हेगारीचे प्रमाण वाढून कायदा - सुव्यवस्था धोक्यात येऊ शकते. त्यामुळे जीवन आधार फाऊंडेशन रेस्क्यु फोर्स महाराष्ट्र राज्य च्या वतीने किराणा दुकान व सुपर मार्केट मध्ये वाईन (मराठी अर्थ ‘दारू’) विक्रीला मंत्रिमंडळाने दिलेले मंजुरी तत्काळ थांबवावी, अशी विंनती करण्यात आली आहे. सदरचा निर्णय परत न घेतल्यास जन आंदोलन करण्यात येईल

इशारा जीवन आधार फाउंडेशन रेस्क्यू फोर्स चे संस्थापक अध्यक्ष शंकर पोवार ,विदर्भ अध्यक्ष संजीव भांबोरे ,विदर्भ प्रसिद्धीप्रमुख पंकज वानखेडे यांनी दिलेला आहे.

महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज, संत गाडगे महाराज, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेव्श्वर महाराज अशा विविध संतांनी समाज निर्व्यसनी व्हावा यासाठी हाल अपेष्ठा सहन करून अभंग व किर्तनातून समाज प्रबोधन केले.

English Summary: Opposition to sale of liquor in grocery stores: - Jeevan Aadhar Foundation Rescue Force Maharashtra State
Published on: 16 February 2022, 01:59 IST