सध्या बारामती तालुक्यातील सोमेश्वर आणि माळेगाव साखर कारखाना कार्यक्षेत्रात शेतकरी आक्रमक झाले आहेत. सोमेश्वर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील 10 गावे माळेगाव कारखान्याला जोडण्यास स्थानिक शेतकरी सभासदांनी विरोध दर्शविला आहे. यामुळे याची चर्चा सुरू आहे.
याबाबत सहकार विभाग व उच्च न्यायालयात जाण्याची तयारी शेतकऱ्यांनी सुरू केली आहे. यामुळे आता काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत भाजप नेते दिलीप खैरे यांनी माहिती दिली आहे. याबाबत सभासदांशी बैठका सुरू आहेत.
याबाबत ते म्हणाले, सोमेश्वरने हा निर्णय घेण्याआधी शेतकऱ्यांना विश्वासात घ्यायला हवे होते. त्यांच्याशी चर्चा करायला हवी होती. केवळ राजकीय व्यवस्था व्हावी, यासाठी हा निर्णय घेतला आहे. सुरुवातीपासून या शेतकऱ्यांची नाळ सोमेश्वर कारखान्याशी जोडली गेली आहे.
सोमेश्वरचे 1100 सभासद असलेल्या गावांतून एकाही सभासदाने कार्यक्षेत्र हस्तांतराची मागणी साखर आयुक्तांकडे किंवा सोमेश्वरकडे केलेली नाही. मात्र तरीही असा निर्णय का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
आता उसासाठी की राजकीय सोय करण्यासाठी हा निर्णय आहे, अशी चर्चा देखील सभासदांमध्ये आहे. माळेगावने 10 गावे समाविष्ट करण्यास 'नाहरकत' द्यावी, असे पत्र सोमेश्वर कारखान्याला दिले आहे. याबाबत माळेगावनेही पोटनियमात दुरुस्ती करीत नवीन 10 गावांचा समावेश करण्यासंदर्भातील ठराव 29 सप्टेंबरच्याच वार्षिक सभेत ठेवला आहे.
पेरु च्या शेतीतून नशीब बदलले, शेटफळचा पेरु पोहोचला केरळच्या बाजारात, दोन एकरात 14 लाखांचे उत्पन्न
आता यावर काय निर्णय होणार हे29 सप्टेंबरला समजणार आहे. माळेगावच्या या वक्रदृष्टीमुळे या 10 गावांतील सभासदांमध्ये नाराजी पसरली आहे. दिलीप खैरे यांनी याबाबत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
महत्वाच्या बातम्या;
शेतकऱ्यांनो घोणस अळीचा विषारी दंश झाला तर लगेच करा 'हे' उपाय
नोकरीला काय करता, डाळिंबाची लागवड करून अवघ्या सातशे झाडांपासून कमावले १८ लाख रुपये
बातमी कामाची! पीक नुकसानीचे 1106 कोटी आले; उद्यापासून बँक खात्यांत होणार जमा
Published on: 22 September 2022, 02:03 IST