News

कोरोनाचा जीवघेणा काळ पाहिल्यानंतर आता गुंतवणुकीसाठी बँकेत मुदत ठेव हा सगळ्यात सोपा आणि सुरक्षित पर्याय दिसतो. यामध्ये गुंतवणूकदारास ठराविक कालावधीत निश्चित उत्पन्न मिळते. तसेच बाजारातील चढ-उतारांचा त्याच्यावर काही परिणाम होत नाही.

Updated on 01 March, 2021 2:17 PM IST

कोरोनाचा जीवघेणा काळ पाहिल्यानंतर आता गुंतवणुकीसाठी बँकेत मुदत ठेव हा सगळ्यात सोपा आणि सुरक्षित पर्याय दिसतो. यामध्ये गुंतवणूकदारास ठराविक कालावधीत निश्चित उत्पन्न मिळते. तसेच बाजारातील चढ-उतारांचा त्याच्यावर काही परिणाम होत नाही.

अशात मार्केटमध्ये अनेक बँका आहेत, ज्या कमी दिवसांमध्ये उत्तम परतावा देणाऱ्या अनेक योजना ग्राहकांसाठी आणत असतात. आताही सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया त्यांच्या ग्राहकांसाठी नवी योजना सुरु करत आहे. देशातील सर्वात मोठी बँक, भारतीय स्टेट बँक (SBI) गुंतवणुकीसाठी एक सुरक्षित पर्याय आहे. एसबीआय बँकेने ग्राहकांना फिक्स्ड डिपॉझिट  ते पब्लिक प्रॉव्हिडंट फंड  मध्ये बचत करण्याच्या अनेक संधी दिल्या आहे. आताही एका नव्या योजनेमध्ये गुंतवणूक करून तुम्हाला दर महिन्याला 10000 रुपये मिळू शकतात. चला या बचत योजनांविषयी जाणून घेऊ....

 

SBI ची एन्युइटी योजना

एसबीआयची ही योजना 36, 60, 84 आणि 120 महिन्यांच्या कालावधीसाठी तयार करण्यात आली आहे.

यात गुंतवणुकीवरचे व्याज दर सेम असेल.

समजा जर तुम्ही पाच वर्षांसाठी गुंतवणूक केली तर तुम्हाला पाच वर्षांच्या मुदत ठेवीवर लागू असलेल्या व्याजदराप्रमाणेच व्याज मिळेल.

 सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सर्व लोक या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

 

कसे मिळतील महिन्याला 10,000 रुपये

जर एखाद्या गुंतवणुकदाराला महिन्याला 10,000 रुपये उत्पन्न हवे असेल तर यासाठी त्याला 5,07,964 रुपयांची गुंवणूक करावी लागणार आहे. जमा रकमेवर त्याला 7 टक्के व्याज दराने परतावा मिळेल, म्हणजे दरमहा 10,000 रुपये. SBI ची ही योजनेत किमान 1000 रुपये मासिक एन्युटीसाठी जमा करावे लागतील. यामध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक करण्यावर कोणतीही मर्यादा नाही.

English Summary: Opportunity to earn Rs 10,000 per month from State Bank of India
Published on: 28 February 2021, 09:39 IST