News

जर तुम्ही नवीन आणि चांगली नोकरीच्या शोधात असाल तर आमच्या जवळ तुमच्या या समस्येचे उत्तर आहे. आम्ही तुम्हाला एक आशा व्यवसायविषयी माहिती देणार आहोत की त्याद्वारे तुम्ही चांगले उत्पन्न मिळवू शकता.

Updated on 08 January, 2021 5:54 PM IST

जर तुम्ही नवीन आणि चांगली नोकरीच्या शोधात असाल तर आमच्या जवळ तुमच्या या समस्येचे उत्तर आहे. आम्ही तुम्हाला एक आशा व्यवसाय विषयी माहिती देणार आहोत की त्याद्वारे तुम्ही चांगले उत्पन्न मिळवू शकता.ते म्हणजे तुम्ही डेरी प्रॉडक्ट तयार करणाऱ्या अमूल कंपनीसोबत व्यवसाय करू शकता.

याबाबत विशेष माहिती अशी की, कंपनी तुम्हाला एक मोठी संधी देत आहे. नव्या वर्षांमध्ये अमूल फ्रेंचायसी ऑफर करीत आहे. त्यामध्ये तुम्ही छोट्याशा गुंतवणुकीने प्रत्येक महिन्याला चांगली कमाई करू शकता. जर तुम्ही अमूलची फ्रॅंचाईजी घेतली तर हा तुमच्यासाठी एक फायद्याचा व्यवहार होऊ शकतो. कारण यामध्ये नुकसान होण्याचे शक्यता कमी असतात. तर मग जाणून घेऊया त्याबाबतची माहिती.

हेही वाचा :पंतप्रधान मुद्रा योजनेचा लाभ घेऊन करा टिश्यू पेपरचा व्यवसाय; होईल दमदार कमाई

 व्यवसायाची माहिती

अमोल कंपनी कोणतीही रॉयल टी विना किंवा प्रॉफिट शेअरिंगचे फ्रेंचायसी ऑफर करत आहे. अमूल कंपनीची फ्रेंचायसी घेण्यासाठी जास्त खर्च येत नाही. तुम्ही २ लाख ते ६ लाख रुपयांमध्ये हा व्यवसाय सुरू करू शकतो. त्यामध्ये तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो. तुम्ही या व्यवसायामध्ये महिन्याला ५  ते १० लाख रुपये कमवू शकता.

हेही वाचा :कमी गुंतवणुकीत करता येणारे व्यवसाय; यातून होईल भरघोस कमाई

फ्रेंचायसी घेण्याची पद्धत

  • अमूल दोन पद्धतीने फ्रेंचायसी ऑफर करते.

  •  पहिला म्हणजे, अमूल आउटलेट फ्रॅंचाईजी, अमूल रेल्वे पार्लर या अमूल किओस्क फ्रेंचायसी

  •  दुसरा म्हणजे, अमूल सकूपींग पार्लरची फ्रेंचायसी

 

जागेची आवश्यकता

 जर तुम्ही अमूल चे आउटलेट घेत असाल तर तुम्हाला कमीतकमी दीडशे वर्गफूट सांगायची गरज पडते. अमोल आईस्क्रीम पार्लर फ्रेंचायसी साठी कमीत कमी ३००चौरस मीटर जागा लागते.

 फ्रेंचायसी घेण्याची प्रक्रिया

  • जर तुम्हाला वरती दिलेल्या फ्रेंचायसी प्रकारांपैकी पहिल्या नंबरचे फ्रेंचायसी मध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला कमीत कमी दोन लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करावी लागते.

  •  वर उल्लेख केल्याप्रमाणे फ्रेंचायसी प्रकारापैकी दुसऱ्या नंबर ची फ्रेंचायसी घ्यायचे असेल कमीत कमी पाच लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करावी लागते.

  • यामध्ये नॉन रिफंडेबल ब्रँड सिक्युरिटी साठी २५ ते ५० हजार रुपये द्यावे लागतात.

 किती मिळेल कमिशन?

 जर तुम्ही अमूल आउटलेट घेतले तर, कंपनीच्या अमोल प्रॉडक्टच्या मिनिमम विक्री किंमत वर म्हणजे एमआरपी वर कमिशन देते. कमिशन कसे मिळते ते खाली पाहू.

  • एक मिल्क पाऊच विक्रीवर पाच टक्के कमिशन

  • मिल्क प्रॉडक्ट वर दहा टक्के कमिशन

  • अमूल आईस्क्रीम स्कॉपिंग ची फ्रेंचायसी घेतल्यानंतर रेसिपी बेस्ट आईस्क्रीम, शेक, पिझ्झा, सँडविच, हॉट चॉकलेट ड्रिंक वर ५० टक्के कमिशन

  • प्री पॅकेड आईस्क्रीम वर २० %

  • याशिवाय अमूल प्रॉडक्टवर १० टक्के कमिशन मिळते.

 

 फ्रेंचायसी साठी अर्ज कसा करावा?

 यासाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला retail@amul.coop या संकेतस्थळावर मेल करावे लागेल किंवा http://amul.com/m/amul-scooping-parlous लिंक वर जाऊन अधिक माहिती मिळू शकते.

English Summary: Opportunity to do business with Amul, get increase income
Published on: 08 January 2021, 05:53 IST