दहावी झाल्यानंतर आयटीआय पूर्ण केल्याची संख्या महाराष्ट्रात भरपूर प्रमाणात आहे. आयटीआय करण्यामागे मुख्यतः स्वतःच्या पायावर उभे राहणे हाच प्रमुख उद्देश असतो. आयटीआय मध्ये विविध प्रकारच्या ट्रेड मध्ये आयटीआय पूर्ण करून संबंधित ट्रेड च्या अनुषंगाने व्यवसायात पदार्पण करता येते.
परंतु ज्या उमेदवारांनी आयटीआय पूर्ण केले आहेत त्यांच्यासाठी भारतीय नौदलामध्ये शेकडो जागांवर नोकरीची संधी चालून आलेली आहे. इंडियन नेव्ही ने एंट्रन्स परीक्षेद्वारे ट्रेडमन मेट साठी जवळजवळ बाराशे पदांवर भरती काढली आहे. तरी या भरती बद्दल सविस्तर माहिती या लेखात घेऊ.
या भरतीत असलेले पद आणि पदसंख्या
पदाचे नाव – ट्रेडस मन मेट
विभागवार पदसंख्या
- ईस्टर्न नेव्हल – एकूण 710 पदे
- वेस्टर्न नेव्हल- एकूण 324 पदे
- सदर्न नेवल- -125 पदे
एकूण पदांची संख्या आहे अकराशे 59
या पदासाठी कमीत कमी 18 हजार रुपयांपासून ते 56 हजार 900 रुपयांपर्यंत प्रति महिना पगार आणि केंद्र सरकारचे विविध भत्ते असा पगार दिला जाणार आहे.
वयाची अट
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे किमान 18 ते कमाल 25 वर्ष असायला हवे. तसेच जे उमेदवार आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छितात त्यांच्यासाठी वयाची अट शिथिल करण्यात येणार आहे.
शिक्षणाची अट
उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून दहावी पास असावा तसेच मान्यताप्राप्त संस्थेतून आयटीआय झालेला असावा.
अर्ज करण्यासंबंधीची लिंक
या पदांसाठी इंडियन नेव्ही च्या अधिकृत संकेतस्थळ joinindiannavy.gov. in वर जाऊन ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची सुरुवात ही 22 फेब्रुवारीपासून सुरू होणार असून सात मार्च संध्याकाळी पाच वाजेपर्यंत अंतिम मुदत आहे. जनरल, इतर मागास प्रवर्ग म्हणजे ओबीसी, इ डब्ल्यू एस साठी अर्ज शुल्क हे दोनशे पाच रुपये आहे. इंडियन नेव्ही मध्ये निघालेल्या या भरतीची परीक्षाही ऑनलाइन आधारित असणार आहे.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
https://mahabharti.in/indian-navy-recruitment-2021
Published on: 23 February 2021, 06:08 IST