News

शेतकरी लक्झरी कारमध्ये बसून बाजारात आपले उत्पादन विकायला जात आहे. तूम्हाला हे खरे वाटत नसेल तर केरळच्या एक शेतकऱ्याची कहानी तुम्ही वाचायला हवीच.

Updated on 30 September, 2023 1:53 PM IST

शेतकरी लक्झरी कारमध्ये बसून बाजारात आपले उत्पादन विकायला जात आहे. तूम्हाला हे खरे वाटत नसेल तर केरळच्या एक शेतकऱ्याची कहानी तुम्ही वाचायला हवीच.

या शेतकऱ्याने मेहनतीच्या जोरावर मोठी प्रगती केली आहे. केरळचा हा शेतकरी साध्यासुध्या नव्हे तर चक्क ऑडी ए 4 मध्ये बसून बाजारात भाजी विकायला जात आहे. शेतीचा व्यवसाय तसा बिनभरोशाचा म्हटला जातो.

शेती करणे हा तसा आतबट्ट्याचा व्यवहार मानला जातो. केरळच्या या ऑडीवाल्या शेतकऱ्याचे नाव सुजीत आहे. तो देखील आधुनिक शेतकऱ्यांच्या पिढीचा प्रतिनिधी आहे. त्याने शेतीसाठी प्रगत तंत्रज्ञान वापरले आहे.

आज तो यशस्वी शेतकरी बनला असून अनेक शेतकऱ्यांचा आदर्श बनला आहे. लोक त्याला रस्त्याच्याकडेला ऑडी कार उभी करून भाजी विकताना पहातात तर आश्चर्यचकीत होऊन जातात.

एका शेतकऱ्यांच्या या प्रगतीने सारे स्तंभीत झाले आहेत. सुजीत त्याच्या विभागात खूप लोकप्रिय आहे. सोशल मिडीयावर त्याचे अकाऊंट आहे. तो शेतीची माहीती शेअर करीत असतो.

शेतकऱ्यांनो दर्जेदार मुरघास निर्मितीचे तंत्र जाणून घ्या..

त्याच्याकडून अनेक जण प्रेरणा घेऊन जैविक शेती शिकत आहेत. इस्टाग्रामवर सुजीत शेअर केलेल्या व्हिडीओत ऑडी कारमधून उतरतो. बाजारात पथारी पसरत त्यावर पालेभाज्या विकताना दिसत आहे.

मोठी बातमी! आता नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र असल्यास उत्पन्नाच्या दाखल्याची गरज नाही, राज्य सरकारचा निर्णय...

English Summary: Open the voice of the farmer! Vegetables were sold from an Audi, the public kept watching
Published on: 30 September 2023, 01:02 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)