आरटीओ ऑफिस संबंधित कामे म्हटले म्हणजे गुंतागुंतीचे काम समजले जाते. त्याच्यातच ड्रायव्हिंग लायसन्स आणि वाहन नोंदणी संबंधित काम राहिले तर अवघडच. परंतु या संबंधि मंत्रालयाने काही नवीन नियम आणले आहेत. त्यामुळे आरटीओ ऑफिस संबंधित बरीच कामे सोपी होतील.यासंबंधीचं नोटिफिकेशन ही सरकारने जारी केला आहे. ज्यामध्ये वाहन नोंदणी मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स देण्यासाठी आधार वापरला जाईल.
मंत्रालयाची नवीन नियमानुसार आधार डेटा आता ऑनलाइन सेवा मध्ये वापरला जाईल. यामध्ये लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स, ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यूअल वाहन नोंदणी आणि संबंधित कागदपत्र बदलण्यासाठी आपला आधार वापरला जाईल.
संबंधित बदल हे रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या आदेशानुसार झाले आहेत. यामध्ये शासनाचा हेतू आहे की ड्रायव्हिंग लायसन्स आणि कार नोंदणी मध्ये बनावट व त्यांची कागदपत्रे वापरण्यापासून थांबवणे हे होय. या नियमानुसार आता ते काम घरात बसून करू शकता.
जर एखाद्या ऑनलाईन सेवा मिळवायच्या असतील तर आधार अथेंतिकेशन वापरून तुमचे काम होईल.
Published on: 19 March 2021, 05:02 IST