News

मराठवाड्याची तहान भागवणारा जायकवाडी धरणातील ( Jayakwadi Dam) पाणीसाठा चिंता वाढवणारा ठरत आहे. गेल्यावर्षी आजच्या दिवशी 96.87 टक्के पाणीसाठा असलेल्या जायकवाडी धरणात यंदा फक्त 33 टक्केच पाणीसाठा शिल्लक असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आगामी काळात जोरदार पाऊस न झाल्यास परिस्थिती आणखीनच गंभीर होण्याची शक्यता आहे.

Updated on 22 September, 2023 10:38 AM IST

मराठवाड्याची तहान भागवणारा जायकवाडी धरणातील ( Jayakwadi Dam) पाणीसाठा चिंता वाढवणारा ठरत आहे. गेल्यावर्षी आजच्या दिवशी 96.87 टक्के पाणीसाठा असलेल्या जायकवाडी धरणात यंदा फक्त 33 टक्केच पाणीसाठा शिल्लक असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आगामी काळात जोरदार पाऊस न झाल्यास परिस्थिती आणखीनच गंभीर होण्याची शक्यता आहे.

गोदावरीच्या माध्यमातून पाणी जायकवाडी धरणात सोडले जाते. मात्र, यंदा नाशिक भागात जोरदार असा पाऊस झालाच नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जायकवाडी धरणात पाणी आलेच नाही. अशा परिस्थितीत धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली नाही. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.

सध्या जायकवाडी धरणात फक्त 33 टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. विशेष म्हणजे 1 जूनपासून आतापर्यंत 326.7490 दलघमी पाण्याची धरणात आवक झाली असून, ही आवक किंचित असल्याचे सांगितले जात आहे. पावसाने दडी मारल्याने मराठवाड्यात (Marathwada) परिस्थिती गंभीर बनली आहे.

त्यामुळे छोट्या-मोठ्या धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील काही भाग शेतीसाठी जायकवाडी धरणाच्या पाण्यावर अवलंबून आहे. जायकवाडी धरणातून छत्रपती संभाजीनगर आणि जालना शहराला पिण्यासाठी पाणीपुरवठा केला जातो. सोबतच बीड, नांदेडसह इतर जिल्ह्यांना शेतीसाठी पाणी पुरवले जाते.

शेतकऱ्यांनो रंगीबेरंगी फुलकोबीची लागवड करण्याची पद्धत जाणून घ्या, मिळेल चांगले उत्पन्न

आजच अनेक भागात पिण्याच्या पाण्यासाठी टँकरचे नियोजन करावे लागत आहे. तसेच पुढील काळात पाऊस न झाल्यास पाण्याचा प्रश्न आणखीच गंभीर होऊ शकतो. त्यामुळे आगामी काळात जोरदार पाऊस न झाल्यास परिस्थिती आणखीनच गंभीर होण्याची शक्यता आहे.

आडसाली ऊस कसा संभाळायचा? आडसाली उसाला कोणती खते द्यावीत? जाणून घ्या...

English Summary: Only 33 percent water storage in Jayakwadi dam this year, terrible situation in Marathwada..
Published on: 22 September 2023, 10:38 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)