News

खरीप हंगामातील पिकांचा विमा काढण्याची मुदत संपल्याने शेकडो शेतकरी पीक विमा योजनेपासून वंचित राहणार होते. भंडारा जिह्यातील सुमारे दोन लाख शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे. 40 हजारांच्यावर शेतकरी यापासून वंचित राहणार होते. पीक विमा अर्ज करण्याची तारीख वाढवली आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

Updated on 03 August, 2023 10:20 AM IST

खरीप हंगामातील पिकांचा विमा काढण्याची मुदत संपल्याने शेकडो शेतकरी पीक विमा योजनेपासून वंचित राहणार होते. भंडारा जिह्यातील सुमारे दोन लाख शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे. 40 हजारांच्यावर शेतकरी यापासून वंचित राहणार होते. पीक विमा अर्ज करण्याची तारीख वाढवली आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

राज्य सरकारच्या विनंतीवरुन केंद्र सरकारने पीक विम्याची मुदत तीन दिवसांनी वाढवली आहे. 31 जुलै ही पीक विम्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख होती. मात्र, यामध्ये बदल करुन तीन ऑगस्टपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे. (Pik Vima) योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याचा उद्या (3 ऑगस्ट) शेवटचा दिवस आहे.

असे असताना केंद्राने मध्य प्रदेश, छत्तीसड, मनिपूर आणि गोव्याला १५ ते १६ दिवसांची मुदतवाढ दिली. तर महाराष्ट्राला केवळ ३ दिवसांची मुदतवाढ दिली होती. मात्र हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मिर, उत्तराखंड आणि पुद्दुचेरी या राज्यांना मुदतवाढ नाकारण्यात आली. केंद्राच्या या भुमिकेवरून नाराजी व्यक्त केली जात आहे.

शेतकऱ्यांनो शिमला मिरची शेती करणार असाल तर जाणून घ्या रोग आणि प्रतिबंधात्मक उपाय

त्यामुळं ज्या शेतकऱ्यांनी (Farmers) अर्ज केला नाही, त्या शेतकऱ्यांनी त्वरीत अर्ज भरावा असं आवाहन कृषी विभागाच्या वतीनं करण्यात आलं आहे. शेतकरी बांधवांनी या खरीप हंगामात एक रुपयात पीक विमा (Pik Vima) भरण्यास उत्तम प्रतिसाद दिला असल्याची माहिती राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे (Agriculture Minister Dhananjay Munde) यांनी दिली.

आतापर्यंत दीड कोटी पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी विमा अर्ज भरले आहेत. तांत्रिक कारणांनी कोणत्याही शेतकऱ्यांचा विमा भरणे मागे राहू नये, यासाठी ऑनलाइन विमा अर्ज करण्यासाठी तीन दिवसांची मुदत वाढ देण्यात आली असल्याचे मुंडे म्हणाले. उर्वरित शेतकरी बांधवांनी आपला विमा अर्ज तीन ऑगस्टच्या आत ऑनलाइन भरुन घ्यावा असे आवाहन धनंजय मुंडे यांनी केलं.

शेतकऱ्यांना फसवणाऱ्या सरकारचं डाेकं ठिकाणावर आणणार

अनेक शेतकऱ्यांनी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी या प्रकरणात विशेष लक्ष देऊन पिक विमा भरण्यासाठी वेबसाईट सुरळीत करून पीक विमा भरण्यासाठी मुदत वाढ देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती. बळीराजाच्या याच मागणीचा विचार करुन राज्य सरकारनं तशी विनंती केंद्र सरकारकडे केली होती.

मोठी बातमी! शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील बीआरएसच्या पक्षात दाखल...
शेतकऱ्यांनो पीक विमा अर्ज करण्याचा उद्या शेवटचा दिवस, सेतू केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी..

English Summary: Only 3 days extension for Maharashtra to pay crop insurance, extension till August 16 in other states
Published on: 03 August 2023, 10:20 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)