यंदा कोकणातील शेतकऱ्याने अस्मानी संकटांपुढे हात टेकले आहेत. सुरवातीला आंब्याच्या झाडाला अपेक्षापेक्षा अधिक मोहर लागल्याने कोकणवासीय अधिकच आनंदी होते. मात्र, त्यांचा हा आनंद अधिक काळ टिकू शकला नाही. आंब्याला मोहर लागताच वातावरणातील बदलामुळे मोहर गळण्यास सुरुवात झाली. अवकाळी पाऊस, मधल्या काळातील धुके, गेल्या आठवड्यातील उन्हाचा सरासरी ३६ अंशाचा पारा आणि आता पुन्हा वातावरणातील पावसाचे वातावरण झाले.
यामुळे कोकणातील काही शेतकऱ्यांच्या बागा जवळपास ९० टक्के उध्वस्त झाल्या आहेत. उष्णतेच्या लाटेचा प्रभाव कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये जाणवत होता. जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस तर रत्नागिरी जिल्ह्यात पारा ३६ अंश सेल्सिअसवर पोचला होता. त्यामुळे या वातावरणाचा परिणाम कोकणातील प्रमुख हापूस आंब्यावर झाला आहे. त्यात अनेक आंब्यांवर खार पडली असून आंबा साका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे भाव देखील वाढण्याची शक्यता आहे.
तर कोवळ्या फळाला वातावरणातील उष्णता न सहन झाल्याने बारीक कैरी पिवळी पडून गळू गेली आहे. तर रत्नागिरीचे पार्थ शिगवण या शेतकऱ्याने आपल्या झाडाचे फोटो काढून परिस्थिती दाखवली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात दोन दिवसापर्यंत पारा ३६ अंश दरम्यान तर आता पावसाचे वातावरण यामुळे नक्की आंबा फळाचे भिवष्य शेतकऱ्यांना देखील सांगता येत नाही. तर उष्ण वातावरणाने यंदाचा मार्च चांगलाच कडकडीत जाणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.
ऐन हंगामात उन्हाचा तडाखा जाणवू लागल्याने कोकणातील हापूस आंबा शेती संकटात आली आहे. शिवाय आंबा, काजूसह कोकमाला फटका बसणार असल्याचे दिसत आहे. यंदा फेब्रुवारी महिन्यात आलेल्या मोहोराला काहीप्रमाणात फळं लागली होती. मात्र सध्या गोटीचा आकार असलेली कैरी पिवळी पडून पडून जाते. हे नुकसान यंदा आंबा उत्पादक शेतकऱ्यांना सहन करावे लागत असून यंदा आंबा हंगामाची स्थिती सांगणे कठीण झाले आहे.
यंदा आंब्याला चांगला मोहर लागला होता. त्यामुळे आम्ही चांगली खते आणि औषधे देखील मारली. मात्र, वातावरणातील बदलाने संपूर्ण मोहर करपून गेला. उर्वरित आंब्यावर धुक्यामुळे खार पडले आहे. तर उष्णतेने आंबा साक्या होण्याची शक्यता बळावली आहे. दरवर्षीपेक्षा फक्त १० टक्के फळॆ झाडाला आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून यंदा काजूने पण फसवल्याची भावना सिंधिदुर्ग, कणकवली येथील कुरंगगव्हाण गावाचे आंबा शेतकरी मधुसूदन पवार यांनी व्यक्त केली.
महत्वाच्या बातम्या;
शेतकऱ्यांनो १० दिवस राहिलेत, निम्मीच रक्कम भरायचीय, महावितरणच्या योजनेत व्हा सहभागी..
'साखर बनवली तर यावर्षी चांगल मार्केट मिळेल पण पुढील वर्षी फार बेकारी होईल, म्हणून..., गडकरींचे मोठे वक्तव्य
वसुली सुरु आहे म्हणून शेतकऱ्यांनी लढवली शक्कल, आता मोदी सरकार कशी करणार वसुली, वाचा..
Published on: 21 March 2022, 10:50 IST