News

कृषी क्षेत्रामध्ये सगळ्या सेवा आता ऑनलाइन होत चालले आहेत. दिवसा देव डिजिटल प्रणाली कृषी क्षेत्रामध्ये रुजत आहे. याच अनुषंगाने डिजिटल स्वाक्षरी असलेला सुधारित सातबारा शेतकऱ्यांच्या हाती पडावा यासाठी ची मोहीम सुरू करण्यात आली आहे. डिजिटल सातबारा विषयी ग्रामसेवक तसेच तलाठी हे देखील अजून अनभिज्ञ आहेत.

Updated on 04 October, 2021 8:53 PM IST

 कृषी क्षेत्रामध्ये सगळ्या सेवा आता ऑनलाइन होत चालले आहेत. दिवसा देव डिजिटल प्रणाली कृषी क्षेत्रामध्ये रुजत आहे. याच अनुषंगाने डिजिटल स्वाक्षरी असलेला सुधारित सातबारा शेतकऱ्यांच्या हाती पडावा यासाठी ची मोहीम सुरू करण्यात आली आहे. डिजिटल सातबारा विषयी ग्रामसेवक तसेच तलाठी हे देखील अजून अनभिज्ञ आहेत.

त्यामुळे या लेखात आपण डिजिटल सातबारा काढायचा कसा याची माहिती घेणार आहोत.

 डिजिटल सातबारा उतारा कसा काढावा?

 शेतकऱ्यांना अत्याधुनिक यंत्रणेची माहिती व्हावी या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. सातबारा उतारा यासाठी शेतकऱ्यांना तलाठी कार्यालयाला चक्कर मारावी लागत होते. मात्र आता घरबसल्या तुम्ही सातबारा उतारा काढू शकणारकाढू शकणार आहेत. शिवाय हा सातबारा कायदेशीर रित्या ग्राह्यराहणार आहे.

डिजिटल सातबारा काढण्याच्या पायऱ्या जाणून घेऊ.

1-https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/dslr या महाराष्ट्र महसूल विभागाच्या वेबसाईटवर जाऊन त्याचे तुम्हाला ऑनलाईन सातबारा उतारा काढण्यासाठी च्या दोन पद्धती दिसतील.

  पहिली पद्धत- रेगुलर लॉगिन

 दुसरी पद्धत- ओटीपी लोगिन

  • पहिलीपद्धत- रेगुलर लॉगिन: जर तुम्ही अगोदर यावर लॉगिन केले असेल तर तुम्हाला इथे नोंदणी करावी लागेल. त्यामध्ये तुम्हाला ओटीपी ची गरज भासणार नाही. ही पद्धत जास्त सोयीस्कर आहे.
  • दुसरी पद्धत- ओटीपी लोगिन: यामध्ये तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येतो. तो प्रत्येक वेळेस तुम्हाला सातबारा काढण्यासाठी टाकावा लागतो. जर तुम्ही या आधीच या संकेतस्थळावर नोंदणी केली असेल तर लॉग इन आयडी आणि पासवर्ड वापरून तुम्ही या साइटवरील सेवांचा लाभ घेऊ शकता.
  • जर सातबारा काढण्याची तुमची पहिलीच वेळ असेल तर न्यू यूजर रजिस्ट्रेशन वर जाऊन क्लिक करावे लागेल. तेथे गेल्यावर तुमची वैयक्तिक माहिती भरून नोंदणी करावी लागेल.
  • यानंतर खाली प्लीज चेक अवेलेबिलिटी ऑफ यूर लोगिन आयडी या ऑप्शनवर क्लिक करून युजरनेम आणि पासवर्ड निवडायचा आहे. त्यानंतर सबमिट वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला युजर रजिस्ट्रेशन सक्सेसफुल क्लिक हेअरटु लोगिन म्हणून एक संदेश दिसेल. याचा अर्थ तुमची यशस्वीरित्या नोंदणी झाली आहे.
  • त्या संदेशा वरील क्लिकहेअर टू लॉग इन वर क्लिक करावे.यानंतर तुम्ही निवडलेला युजरनेम, पासवर्ड आणि कॅपच्या कोड टाकून लॉग इन करावे.
  • त्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल. त्यात तुमचा जिल्हा, तालुका आणि गाव ठाकूर सातबारा चा सर्वे नंबर, गट नंबर टाकून अंकित सातबारा हा पर्याय निवडायचा आहे.
  • त्यानंतर ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी प्रथम रिचार्ज अकाउंट या पर्यायावर क्लिक करून अगोदर तुमच्या अकाउंट मध्ये काही रक्कम द्यावी लागेल.प्रत्येक डिजिटल स्वाक्षरी सातबारा चे डिजिटल ऑनलाईन सातबारा एक पेज डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला पंधरा रुपये इतकी  किंमत आकारली जाते. हे रक्कम तुम्ही बनवलेल्या सातबारा डिजिटल स्वाक्षरी या ऑनलाइन अकाऊंट मध्ये रिचार्ज केलेल्या रकमेतून  कमी केली जाते.( स्त्रोत-tv9 मराठी)
English Summary: online process of digital signed saatbaara utara
Published on: 04 October 2021, 08:53 IST