मुंबई- मार्केटिंग कौशल्य व सोशल मीडियाचे ज्ञान यामुळे उत्पादनांची ब्रँडिंग करणे शक्य होत आहे. ऑनलाईन उपलब्ध होणाऱ्या वस्तूंच्या यादीत आता शेणापासून निर्मित पदार्थांचाही समावेश झाला आहे. ग्राहकांकडून आयुर्वेदिक महत्व जाणून गोवऱ्यांसाठी (cow dung) ‘अॅमेझॉन’ वर मागणी नोंदविली जात आहे.
गाईला आयुर्वेदात महत्वाचे स्थान आहे. गाईचे दूध, गोमूत्र, शेण, तूप, दही व त्यापासून बनलेले पदार्थ यांत औषधी गुण असल्याचे आयुर्वेदात सांगितले आहे.त्याला पंचगव्य असे म्हणतात. गाईचे शेणाची औषधीय उपयुक्तता देखील अधिक मानली जाते. गाईच्या शेणापासून सारविलेल्या जागेत किटकांचे प्रमाण कमी आढळत असल्याचे आढळून आले होते.
रामबाण ‘गोवऱ्या’:
धार्मिक विधी, गच्चीवरील बागा किंवा मोकळ्या जागेतील उद्यानात खत, वाढत्या किटकांचा प्रादूर्भाव कमी करण्यासाठी गोवऱ्यांचा वापर केला जातो. गोवऱ्यांमध्ये असलेल्या सेंद्रीय घटकांमुळे वनस्पतींच्या वाढीस उपयुक्त असल्याचा दावा केला जातो. त्यामुळे गोवऱ्यांची मागणी अलीकडच्या काळात वाढलेली दिसून येते.
Published on: 29 September 2021, 11:02 IST