1. बातम्या

गाईच्या शेणाचं ऑनलाईन ‘ब्रँडिंग’; ‘अ‍ॅमेझॉन’ वर गोवऱ्यांना डिमांड

मुंबई- मार्केटिंग कौशल्य व सोशल मीडियाचे ज्ञान यामुळे उत्पादनांची ब्रँडिंग करणे शक्य होत आहे. ऑनलाईन उपलब्ध होणाऱ्या वस्तूंच्या यादीत आता शेणापासून निर्मित पदार्थांचाही समावेश झाला आहे. ग्राहकांकडून आयुर्वेदिक महत्व जाणून गोवऱ्यांसाठी (cow dung) ‘अ‍ॅमेझॉन’ वर मागणी नोंदविली जात आहे.

ललिता बर्गे
ललिता बर्गे
cow dung

cow dung

मुंबई-  मार्केटिंग कौशल्य व सोशल मीडियाचे ज्ञान यामुळे उत्पादनांची ब्रँडिंग करणे शक्य होत आहे. ऑनलाईन उपलब्ध होणाऱ्या वस्तूंच्या यादीत आता शेणापासून निर्मित पदार्थांचाही समावेश झाला आहे. ग्राहकांकडून आयुर्वेदिक महत्व जाणून गोवऱ्यांसाठी (cow dung) ‘अ‍ॅमेझॉन’ वर मागणी नोंदविली जात आहे.

गाईला आयुर्वेदात महत्वाचे स्थान आहे. गाईचे दूध, गोमूत्र, शेण, तूप, दही व त्यापासून बनलेले पदार्थ यांत औषधी गुण असल्याचे आयुर्वेदात सांगितले आहे.त्याला पंचगव्य असे म्हणतात. गाईचे शेणाची औषधीय उपयुक्तता देखील अधिक मानली जाते. गाईच्या शेणापासून सारविलेल्या जागेत किटकांचे प्रमाण कमी आढळत असल्याचे आढळून आले होते.

रामबाण ‘गोवऱ्या’:

धार्मिक विधी, गच्चीवरील बागा किंवा मोकळ्या जागेतील उद्यानात खत, वाढत्या किटकांचा प्रादूर्भाव कमी करण्यासाठी गोवऱ्यांचा वापर केला जातो. गोवऱ्यांमध्ये असलेल्या सेंद्रीय घटकांमुळे वनस्पतींच्या वाढीस उपयुक्त असल्याचा दावा केला जातो. त्यामुळे गोवऱ्यांची मागणी अलीकडच्या काळात वाढलेली दिसून येते.

गो सिद्धी ते काऊ केक:

‘ई’ कॉमर्स कंपन्यांच्या वेबसाईटवर विविध प्रकारचे पदार्थ विक्रीसाठी उपलब्ध असतात. ऑनलाईन मागणी नोंदविल्यानंतर घरपोच वस्तू उपलब्ध केल्या जातात. शहरी भागातून गोवऱ्यांची मागणी नोंदविलेली दिसते. गो सिद्धी, काऊ केक, गोवर कंडा अशा विविध नावांनी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर उत्पादने विक्रीस आहेत.

शेणातून अर्थक्रांती:

गाईच्या शेणापासून बनविलेल्या पदार्थांच्या वाढत्या मागणीमुळे शेतकऱ्यांना नवे उत्पादनाचे साधन उपलब्ध होणार आहे. आकर्षक वेष्टन, योग्य प्रक्रिया यांचा मेळ साधल्यास उत्पादनांची निर्मिती करणे शक्य होईल.

दहाच्या पटीत  व विविध आकारांमध्ये गोवऱ्यांचे पॅकिंग करण्यात येते. 60 रुपयांपासून 250 रुपयांपर्यंत संख्येनुसार गोवऱ्यांच्या किंमती आहेत.

आर्थिक ‘बूस्टर’ डोस:

महिला किंवा पुरुष बचत गटांना अर्थाजनाचे साधन ग्रामीण पातळीवर उपलब्ध होऊ शकते. छत्तीसगड सरकारची ‘गोधन न्याय योजना’ सध्या प्रगतीपथावर आहे. गोमय उत्पादन बनविणाऱ्यांना गटांना अर्थसहाय्याचा पुरवठा यामार्फत केला जातो आणि उत्पादनांना सरकारी यंत्रणेद्वारे खरेदी केली जाते. तसेच ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर विक्रीसाठी पाठबळ दिले जाते. 

English Summary: online branding of dung demand on amazone Published on: 29 September 2021, 11:02 IST

Like this article?

Hey! I am ललिता बर्गे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters