News

कांद्याच्या दरात मोठी घसरण झालयामुळे कांदा उत्पादक शेतकरी संतप्त झाले आहे. नाफेडच्या माध्यमातून बाजार समितीत कांद्याची खरेदी सुरु करण्याचे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते.

Updated on 06 March, 2023 3:46 PM IST

कांद्याच्या दरात मोठी घसरण झालयामुळे कांदा उत्पादक शेतकरी संतप्त झाले आहे. नाफेडच्या माध्यमातून बाजार समितीत कांद्याची खरेदी सुरु करण्याचे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते.

कांद्याच्या दरामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. कांद्याला कवडीचाही दर मिळत नसल्यामुळे कांदा (Onion Subsidy) बाजारात विकायला न्यावा की नाही? असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला आहे. कारण बाजारात कांदा विक्रीस नेल्यानंतर कांद्याची पट्टी हाती येत नाही.

असे असताना आता भविष्यात ज्या-ज्या ठिकाणी मागणी येईल तिथे कांदा खरेदी होईल. नाफेडद्वारे (Nafed) आतापर्यंत 28 हजार मेट्रिक टन कांदा खरेदी केला आहे. अजूनही कांद्याची खरेदी करु असे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी म्हटले आहे.

रब्बी ज्वारी

राज्यात कांदा (onion) प्रश्नावरुन वातावरण चांगलच तापलं आहे. कांदा दराच्या मुद्यावरुन सभागृहातही विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने आल्याचं पाहायला मिळालं. तसेच विविध ठिकाणचे शेतकरीही (Farmers) आक्रमक झाले आहेत. अशातच आता यावर राज्य सरकार मार्ग काढण्याच्या तयारीत आहे.

कांदा उत्पादक शेतकऱ्याला पुढच्या आठवड्यात राज्य सरकार दिलासा देण्याची शक्यता आहे. विधीमंडळाच्या अधिवेशनात (Budget Session) कांदा प्रश्नावरुन विरोधक आक्रमक झाले आहेत. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis) यांनी नाफेडच्या माध्यमातून तीन कंपन्यांमार्फत कांदा खरेदी सुरु करण्यात आल्याचे सांगितलं.

शेतकऱ्यांनो चारा साठवणुकीचे असे करा नियोजन

बाजार समितीमध्ये लवकरच कांदा खरेदी केंद्रे (Onion buying centers) सुरु करण्यात येतील असंही त्यांनी सांगितले होते. सध्या कांदा उत्पादक शेतकरी (Agricultural Information) अडचणीत आहेत. सतत कांद्याला दर मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्यात यावे याबाबत चर्चा सुरू आहेत.

महत्वाच्या बातम्या;
ज्वारीच्या भाकरीचे आहारातील महत्त्व; जाणून घ्या
शेतकऱ्यांनो काळजी घ्या! बहुतांशी जिल्ह्यांत पावसासह गारपिटीची शक्यता
शेतकऱ्यांनो उत्पन्न वाढीचा आराखडा तयार करा

English Summary: Onion will be bought where there is demand, farmers will get big help soon, state government's decision
Published on: 06 March 2023, 03:46 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)