News

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पीक पेरा अटीतून दिलासा मिळाला आहे. कांदा अनुदानासाठी अर्ज करण्यास मदत वाढ मिळाली आहे. ई - पीक पेरा पाहणीची अट रद्द करण्यात आलेली नाही. परंतु, सरकारनं पर्यायी मार्ग काढल्याने कांदा उत्पादक शेतकरी कांदा अनुदानासाठी पात्र असणार आहेत. सन २०२२-२३ मधील कांदा अनुदानासाठी सातबारा उताऱ्यावरील ई पीक पेरा नोंदणी बाबत एक पत्रक शासनाकडून जारी करण्यात आले आहे.

Updated on 24 April, 2023 11:36 AM IST

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पीक पेरा अटीतून दिलासा मिळाला आहे. कांदा अनुदानासाठी अर्ज करण्यास मदत वाढ मिळाली आहे. ई - पीक पेरा पाहणीची अट रद्द करण्यात आलेली नाही. परंतु, सरकारनं पर्यायी मार्ग काढल्याने कांदा उत्पादक शेतकरी कांदा अनुदानासाठी पात्र असणार आहेत. सन २०२२-२३ मधील कांदा अनुदानासाठी सातबारा उताऱ्यावरील ई पीक पेरा नोंदणी बाबत एक पत्रक शासनाकडून जारी करण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वी कांद्याचे दर हे 200 ते 400 रुपयांपर्यंत कोसळले होते. यामुळे हैराण झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी बाजार समितीचे लिलाव बंद पाडले होते. तर काही शेतकऱ्यांनी कांदा रस्त्यावर ओतून आपला रोष व्यक्त केला होता. या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू असताना विरोधकांनी कांद्याला अनुदान देण्याची जोरदार मागणी केली होती.

राज्य सरकारने ही मागणी मान्य केली होती. यामुळे कांदा उत्पादकांना दिलासा मिळाला होता. मात्र हे अनुदान मिळण्यासाठी सरकारने काही अटी घातल्या होत्या. मात्र त्यात एक अशी अट होती ज्यामुळे शेतकऱ्यांना अनुदानाच्या लाभापासून वंचित राहावं लागण्याची शक्यता होती. ती अट होती ई पीक पाहणीची. शेतकऱ्यांनी याबद्दल आपली तक्रार सरकार दरबारी नोंदवली होती. आता ही अट सरकारनं रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

शेतकऱ्यांनो कांदा बीजोत्पादन व्यवस्थापन, जाणून घ्या

ॲपद्वारे पीक नोंदणी झाल्यास शेतकऱ्यांना मदत होते. ही नोंदणी शेतकऱ्यांनी स्वत:हून करायची आहे. ही नोंदणी थेट लाभाच्या योजनेसाठी आवश्यक आहे. अतिवृष्टी किंवा दुष्काळ यामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई यासह अन्य योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी नोंद करणे गरेजेचे आहे.

देशात दिवसभरात 10,112 कोरोना रुग्ण, 29 मृत्यू; गेल्या महिन्याच्या तुलनेत मोठी वाढ..
7.2 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाने न्यूझीलंड हादरला..
आता फक्त २ हजार रुपयांत होणार शेतजमिनींची अदलाबदल, जाणून घ्या कसे..

English Summary: Onion Subsidy: Relief to onion farmers, the state government has taken a big decision..
Published on: 24 April 2023, 11:36 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)