News

नाशिक जिल्हा देशात प्रमुख कांदा उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. नाशिक ज्याप्रमाणे द्राक्षाचे पंढरी म्हणून ओळखला जातो त्याच प्रमाणे या जिल्ह्याला कांद्याचे आगार म्हणून देखील संबोधतात. जिल्ह्यात जवळपास सर्वत्र कांदा या नगदी पिकांची मोठ्या प्रमाणात सर्व हंगामात लागवड केली जाते. जिल्ह्यातील कळवण सटाणा मालेगाव देवळा अर्थात कसमादे पट्टा किंवा मौसम खोरे म्हणून जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या परिसरात मोठ्या प्रमाणात कांदा लागवड केली जाते. मोसम खोऱ्यातील जवळपास बहुतांश शेतकरी कांदा पिकावर अवलंबून असतात, येथील शेतकऱ्यांचे सर्व अर्थकारण हे कांदा पिकावरच चालत असते.

Updated on 19 January, 2022 12:04 PM IST

मात्र असे असले तरी यावर्षी कसमादे परिसरात कांदा लागवडीसाठी भीषण मजुरांची टंचाई निर्माण झाली होती, परिणामी रब्बी हंगामातील उन्हाळी कांदा लागवड लांबल्याचे चित्र नजरेस पडत आहे. तसेच मजूर टंचाईमुळे मजुरांना वाढीव मजुरी परिसरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना द्यावी लागत आहे. परिणामी कांदा लागवडीसाठी येणाऱ्या उत्पादन खर्चात कमालीची वाढ नोंदविण्यात आली आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी कांदा लागवड करण्याऐवजी कांदा पिकाची पेरणी करण्यास जास्त पसंती दर्शवली आहे. तसेच अनेक कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांदा लागवडीसाठी विकसित केलेल्या यंत्राचा देखील यावेळी वापर केल्याचे नजरेस पडले आहे. बागलाण तालुक्यातील दह्याने गावातील रहिवासी शेतकरी रोहित भामरे यांनी कांदा लागवडीला फाटा देत कांदा पेरणी करून मजूर टंचाईवर एक उत्तम पर्याय शोधून काढला आहे. रोहित भांमरे हे तरुण, उच्चविद्याविभूषित शेतकरी आहेत. रोहित भामरे यांनी कांदा पेरणी साठी सर्वप्रथम बैलजोडी वर चालणारे कांदा पेरणीचे यंत्र आणले आणि त्यात आवश्यक ते बदल करून ट्रॅक्टरसाठी कांदा पेरणी यंत्र तयार करून घेतले. विशेष म्हणजे रोहित गेल्या तीन-चार वर्षापासून कांद्याची लागवड करण्यापेक्षा कांदा पेरणीलाच प्राधान्य देत आहेत, आणि रोहित यांना कांदा पेरणी तून चांगले घवघवीत उत्पादन देखील प्राप्त होत आहे.

यावर्षी कसमादे परिसरात मजुरांची खूप टंचाई निर्माण झाली होती, त्यामुळे कसमादे परिसरात रब्बी हंगामातील कांदा लागवड पुरता रखडलेली होती. रोहित यांचा हा नावीन्यपूर्ण प्रयोग अशा परिस्थितीत मोठ्या फायद्याचा सिद्ध झाला. तसं बघायला गेलं तर रोहित गेल्या चार पाच वर्षापासून पेरणी यंत्राद्वारेच कांद्याची पेरणी करत आहेत. मात्र यावर्षी कसमादे परिसरात मजूर टंचाई भासल्याने रोहित यांना या यंत्राचे व कांदा पेरणीचे महत्व समजले. तसेच परिसरातील इतर शेतकऱ्यांना देखील कांदा पेरणीचे महत्व समजले. कांदा पेरणी केल्यामुळे, कांदाच्या रोपवाटिका तयार करा आणि पुन्हा पुनर्लागवड करा हा सर्व आटापिटा मिटून जातो. शिवाय, यामुळे सरळसरळ पुनर्लागवडीचा खर्च वाचतो. फक्त लागवडीचा खर्च वाचतो असे नाही तर यामुळे बियाणे देखील कमी लागत असते. 

त्यामुळे कांदा पेरणी केल्यास उत्पादन खर्चात कमालीची बचत होते. तसेच कृषी क्षेत्रातील जाणकार लोक सांगतात की, पेरणी केलेल्या कांद्यामध्ये रोगप्रतिकारक क्षमता ही लागवड केलेल्या कांद्यापेक्षा अधिक असते त्यामुळे पेरणी केलेल्या कांद्यावर रोगांचे सावट कमी नजरेस पडते परिणामी उत्पादनात घसघशीत वाढ होते. त्यामुळे कसमादे परिसरातील अनेक कांदा उत्पादक शेतकरी आता कांदा पेरणीला प्राधान्य देताना दिसत आहेत.

English Summary: onion sowing increased instead of onion planting in nashik
Published on: 19 January 2022, 12:04 IST