News

मागच्या काही दिवसांपासून कांदा बियाणे च्या भावाचे झालेली प्रचंड वाढ पाहता तसेच बरेच बियाणे सदोष निघाल्याने बऱ्याच शेतकऱ्यांना यावर्षी मनस्ताप सहन करावा लागला. यावर उपाय म्हणून महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरूडॉ.प्रशांत कुमार पाटील व संशोधन संचालक डॉ. शरद गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली याहीवर्षी विद्यापीठाच्या मोठ्या प्रमाणावर मागणी असलेल्या कांदा बियाण्यांची विक्री ऑनलाइन होणार असल्याची माहिती बियाणे विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. आनंद सोळंके यांनी दिली. येत्या 11 जून रोजी त्यांच्या ऑनलाईन नोंदणी सुरू होणार आहे. अशा आशयाची बातमी सकाळ दैनिकाने दिले आहे

Updated on 11 June, 2021 10:29 AM IST

कांदा बियाणे ऑनलाईन पद्धतीने विक्री करण्याचा निर्णय हा मागच्या वर्षी देखील झाला होता. कारण करणामुळे मागच्या वर्षी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कांदा बियाण्याची विक्री कशी करावी असा प्रश्न  विद्यापीठाचे अधिकारी वर्गाला होता. कारण विद्यापीठाच्या कांदा बियाण्याला  प्रचंड मागणी असते व बियाणे विक्री पोलीस संरक्षणात सुद्धा  करावे लागते. मागच्या वर्षी ज्या ऑनलाइन नोंदणीला  अडचणी आल्या होत्या त्या दूर करून संगणकीय प्रणाली मध्ये सुधारणा करून कोरोना विषाणू संसर्ग टाळण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने कांदा बियाणे विक्री  करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

   हे कांदा बियाणे कसे बुकिंग करावे?

 नोंदणी पद्धत अत्यंत साधी आणि सोपी असून आधार कार्ड आणि सातबारा उतारा या पोर्टलवर अपलोड करून नोंदणी करता येणार आहे. नोंदणी पूर्ण होताच डेबिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून पेमेंट करून नोंदणी प्रक्रिया पूर्ण होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जोपर्यंत पोर्टलवर बियाण्यांची उपलब्धता दिसते तोपर्यंत बियाणे नोंदणी  करावी.पोर्टल वरील बियाणे उपलब्धता संपताच पुढे नवीन नोंदणी व्यवस्थेमध्ये होणार नाही याची नोंद शेतकऱ्यांनी घ्यावी असे आवाहन डॉ. सोळंकी यांनी केले आहे

. या शेतकऱ्यांची बियाणे नोंदणी यशस्वी झाली आहे अशा शेतकऱ्यांना त्यांच्या जवळच्या संशोधन केंद्रावर उदा. पिंपळगाव बसवंत, धुळे, राहुरी  इत्यादी ठिकाणी बियाणी पुरवण्याची व्यवस्थाडॉ.प्रमोद बेल्हेकर आणि त्यांच्या विपणन ग्रुप कडून पार पाडण्यात येणार आहे. 

 

मेझॉन, फ्लिपकार्ट ऑनलाईन कंपनीच्या नोंदणी प्रमाणेच फुले ऍग्रो मार्ट पोर्टलवर नोंदणी करून  लगेचच इंटरनेट बँकिंग, डेबिट कार्डद्वारे पैसे भरून नोंदणी पूर्ण करता येईल, अशी माहिती बियाणे  विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञडॉ.आनंद सोळंके यांनी दिली

 

  https://www.phuleagromart.org या वेबसाईटवर 11 जून पासून ते बियाणे संपेपर्यंत कांदा बियाणे खरेदीची  नोंदणी करता येणार आहे.

 सौजन्य- सकाळ

English Summary: onion seeds
Published on: 11 June 2021, 10:29 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)