मागील महिन्यात कांद्याचे दर दोन दिवसाला दर वाढतच चालले होते मात्र आता एका रात्रीत दर कसे घसरले आहेत ते आपणास कांदा नगरीत पाहायला भेटत आहे. मागील महिन्यात कांद्याचा भाव तीन हजार प्रति क्विंटलवर पोहचलेला होता जो की एका रात्रीत असे भाव घसरले आहेत की कांदा प्रति क्विंटल हजार रुपयांच्या आत आलेला आहे. महाराष्ट्र राज्यातील कांद्यासाठी मुख्य बाजारपेठ म्हणजे लासलगाव बाजारपेठ. लासलगाव कृषी बाजार समितीमध्ये कांद्याचे चांगलेच भाव घसरले आहेत. मागील आठवड्यात शनिवार च्या तुलनेत बुधवारी कांदा ४२५ रुपये ने घसरला आहे. कांद्याचे असे भाव बघता उन्हाळी कांदा पूर्ण क्षमतेने अजून सुरू झालेला नाही. मात्र भविष्यात हे दर कुठे जाऊन ठेपणार आहेत ते काही सांगू शकणार नाही.
कांद्याचे दर घटन्यामागचे कारण काय?
देशातील गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान येथील शिखर तसेच पश्चिम बंगाल येथील सुखसागर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लाल कांद्याची आवक सुरू झाली आहे तर दुसऱ्या बाजूला नाशिक, अहमदनगर व पुणे जिल्ह्यातील चाकण आणि सोलापूर या भागात सुद्धा उन्हाळी कांद्याची आवक लाल कांद्याप्रमाणेच सुरू असल्याने याचा परिणाम थेट दरावर होत आहे. मागणी कमी आणि आवक जास्त होत असल्याने असे चित्र पाहायला भेटत आहे. मागील महिन्यात आवक जरी जास्त असली तरी दर हे टिकून होते कारण त्याप्रमाणे मागणी सुद्धा होती आणि सर्वात महत्वाचे म्हणजे खरीप हंगामातील कांदाच शेतकऱ्यांकडे होता पण आता उन्हाळी कांदा सुद्धा दाखल होऊ लागला आहे.
काय आहे कांदा नगरीतले चित्र?
लासलगाव बाजार समितीमध्ये शनिवारी १ हजार २६७ वाहनातून २२ हजार ४५ क्विंटल कांद्याची आवक झालेली होती. जे की कमाल १५५१ रुपये तर किमान ५०० रुपये असा कांद्याला १३०० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला आहे. तर सोमवारी ९०० वाहनातून ३२ हजार ५०० क्विंटल कांद्याची लासलगाव बाजार समितीत आवक झाली होती. लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याला कमाल ११८० रुपये तर किमान ४०० रुपये भाव मिळाला आहे. सर्वसाधारणपणे कांद्याला ८७५ रुपये प्रतिक्विंटल असा भाव मिळाला आहे.
अवकाळी अन् ढगाळ वातावरणाचा परिणाम :-
मागील आठवड्यात राज्यात अवकाळी तसेच ढगाळ वातावरण तयार झाले होते. यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पिकाची काढणी करून शेतमाल बाजारात दाखल करण्यास सुरू केले. शेतकऱ्यांचे असे म्हणणे होते की दर कमी मिळाला तरी चालेल पण शेतामध्ये नुकसान नाही झाले पाहिजे. या कारणामुळे कमी कालावधीत जास्त आवक वाढली तरी अजून उन्हाळी हंगामातील कांदा बाजारात दाखल झाला नाही.
Published on: 16 March 2022, 05:57 IST