नाशिक: गेल्या 5 महिन्यांपासून कांद्याच्या दरात सतत घसरण होत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी संकटात सापडला आहे. कांदा दारावर कोणाचाही अंकुश राहिला नाही. व्यापाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे कांदा दरावर परिणाम होत आहे.
कांदा दराचा प्रश्न पेटला
कांदा उत्पादक संघटनेने कांद्याला किमान 25 रुपये किलो दर मिळावा अशी मागणी (Onion Growers Association) केली होती. शासनाने ही मागणी मान्य न केल्यास शेतकऱ्यांनी (Onion) कांदा विक्रीच करु नये असे आवाहन करण्यात आले होते.
घटत्या दरामुळे शेतकऱ्यांचे वांदे होत होते तर आता व्यापारी आणि ग्राहकांचेच वांदे करण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे. लासलगाव कांदा मार्केटमध्ये कांद्याची आवक ही घटली आहे.
पीएम किसान लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! ई-केवायसीसाठी सरकारने वाढवली मुदत
निर्यातीला प्रति क्विंटल 500 रूपये अनुदान मिळावे अशा मागण्या करीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रविंद्र मोरे यांच्यासह कार्यकर्त्यांनी राहुरी शहरात नगर-मनमाड महामार्ग अडवत रास्ता रोको केला.
दरम्यान रस्त्यावर वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. मागण्या मान्य केल्या नाही तर यानंतर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांची होणार दिवाळी! शिंदे सरकारचा मोठा निर्णय, महागाई भत्त्यात वाढ
Published on: 17 August 2022, 03:54 IST