यावर्षी खरीप हंगामात लावल्या गेलेल्या कांद्याचे कधी अतिवृष्टी तर कधी अवकाळी मुळे मोठे नुकसान झाले आहे. खरीप हंगामात एकूण कांदा उत्पादनापैकी सुमारे 20 टक्के कांद्याचे उत्पादन घेतले जाते. मात्र खरीप हंगामात लावल्या गेलेल्या कांद्याला या हंगामात निसर्गाच्या अवकृपेचा सामना करावा लागला आहे आणि त्यामुळे उत्पादनात खूप मोठी घट घडून आली आहे. आता राज्यात खरीप हंगामाच्या लाल कांद्याची काढणी सुरु आहे आणि मोठ्या प्रमाणात लाल कांद्याची आवक बाजारात दाखल होत आहे. आता बाजारात लाल कांद्याला तीन हजार रुपये प्रति क्विंटलहुन अधिक दर मिळत आहे
मात्र असे असले तरी अनेक कांदा उत्पादक शेतकरी विक्रमी बाजार भाव असताना देखील नाखूष असल्याचे समोर येत आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना खरीप हंगामात मोठे नुकसान सहन करावे लागले आहे खरीप हंगामात आलेल्या अवकाळी मुळे कांद्याच्या उत्पादनात लक्षणीय घट नमूद करण्यात आली आहे त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादनाची भरपाई बाजार भावातन निघेल अशी आशा आहे. म्हणून सध्या मिळत असलेला बाजार भाव उत्पादनाची कसर काढण्यास पुरेसा नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी नाराज असल्याचे समजत आहे.
4 तारखेला म्हणजे मंगळवारी राज्यात कोल्हापूर बाजार समिती कांद्याला विक्रमी 3525 रुपये प्रति क्विंटल एवढा बाजार भाव प्राप्त झाला होता. सोलापूरच्या बाजार समितीत देखील या दिवशी कांद्याला तीन हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत बाजार भाव प्राप्त झाला होता. मात्र विक्रमी बाजार भाव जरी असला तरी देखील यामुळे शेतकऱ्यांना फायदा होताना दिसत नाहीये कारण की उत्पादनात 60 टक्के घट नमूद करण्यात आली आहे त्यामुळे एवढी मोठी घट भरून काढण्यासाठी कांद्याला यापेक्षाही अधिक बाजार भाव प्राप्त व्हायला हवा. मात्र बाजारभाव हा अद्यापही पाच हजाराच्या खालीच असल्याने कांदा उत्पादक शेतकरी कमालीचा नाराज बघायला मिळत आहे. महाराष्ट्र हे देशातील प्रमुख कांदा उत्पादक राज्य आहे. राज्यातील अनेक शेतकऱ्यांचे सर्व अर्थकारण हे कांदा पिकावर अवलंबून असते.
पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांचे कांदा एक प्रमुख पीक आहे, त्यामुळे याच्या उत्पादनात घट झाली तर शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर त्याचा विपरीत परिणाम बघायला मिळतो. राज्यातील नाशिक अहमदनगर या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यात तसेच खानदेश मधील धुळे जळगाव या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कांदा लागवड नजरेस पडते. येथील शेतकरी कांदा पिकावर मोठ्या प्रमाणात अवलंबून असतात. मात्र यावर्षी याच भागात अवकाळी पावसाने वारंवार हजेरी लावून कांद्याच्या उत्पादनात घट घडवून आणली त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादनाची कसर भरून काढण्यासाठी जास्त बाजार भावाची अपेक्षा आहे मात्र अद्याप तरी बाजार भाव हा पाच हजाराच्या खालीच आहे म्हणून अनेक कांदा उत्पादक शेतकरी विक्रमी बाजार भाव असताना देखील नाखुष आहेत.
Published on: 07 January 2022, 10:13 IST