राज्यातील बहुतांश शेतकरी कांदा लागवड (Onion planting) करत असतो, देशातील एकूण कांद्याच्या उत्पादनात राज्यातील नाशिक जिल्ह्याचा सिंहाचा वाटा असल्याचे सांगितले जाते. नाशिक जिल्ह्यातील कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा म्हणजे कसमादे पट्ट्याचे शेतकऱ्यांचे सर्व अर्थकारण हे कांदा पिकावर अवलंबून (Depending on the onion crop) आहे. भारतातील सर्वात मोठी नव्हे नव्हे तर आशिया खंडातली सर्वात मोठी बाजारपेठ (The largest market in Asia) म्हणून लासलगाव बाजारपेठेची ओळख निर्माण झाली आहे.
देशातील कांद्याचे बाजारभाव ठरवणारे सूत्रधार बाजारपेठ म्हणुन लासलगाव मार्केटला प्रसिद्धी मिळाली आहे. लासलगाव बाजार पेठेत मिळालेले दर हे देशातील इतर बाजारपेठेवर प्रभाव टाकत असतात. त्यामुळे या बाजारपेठेवर सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे विशेष लक्ष असते, त्यामुळे आता याच बाजार समितीतून कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी थोडीशी दिलासादायक बातमी समोर येत आहे. मागच्या वर्षी म्हणजे 2020 च्या डिसेंबर महिन्यात कांद्याला मिळालेल्या बाजारभावपेक्षा 2021 मधील डिसेंबर महिन्याचा कांद्याच्या दरात थोडीशी वाढ नमूद करण्यात आली आहे. आणि यामुळे या वर्षी अर्थात 2022 मध्ये देखील कांद्याच्या भावात काहीशी अशीच परिस्थिती कायम राहील अशी शेतकऱ्यांना आशा आहे. असे असले तरी, कांदा पिकाला बेभरवशाचे पीक म्हणून शेतकरी बांधव संबोधत असतो. त्यामुळे कांद्याच्या दराचा कयास बांधणे हे नजरेला पडत एवढं सोपं नाहीये, तरीदेखील यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना (To onion growers) तात्पुरता दिलासा मिळेल असे चित्र दिसत आहे.
लासलगाव बाजार समितीत (In Lasalgaon Market Committee 2021) यावर्षी डिसेंबर महिन्यात उन्हाळी कांद्याची जवळपास 78 हजार क्विंटल आवक बघायला मिळाली होती. आणि डिसेंबर 2021 मध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर 600 तर कमाल दर 3200 मिळाला होता, तसेच सर्वसाधारण दर हा 2217 रुपये प्रति क्विंटल एवढा राहिला होता. याच डिसेंबर 2021 मध्ये लाल कांद्याची जवळपास 7 लाख क्विंटल कांद्याची आवक झाली होती, आणि लाल कांद्याला किमान दर 500 रुपये प्रति क्विंटल तर कमाल दर 3500 रुपये प्रति क्विंटल प्राप्त झाला होता, तसेच सर्वसाधारण दर 2160 रुपये प्रति क्विंटल एवढा प्राप्त झाला होता.
डिसेंबर 2020 मध्ये उन्हाळी कांद्याला सर्वसाधारण दर 2192 रुपये प्रति क्विंटल एवढा होता, तर याच महिन्यात लाल कांद्याला 2586 रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी दर होता. एकंदरीत उन्हाळी कांद्याला डिसेंबर 2020 च्या तुलनेत डिसेंबर 2021 मध्ये चांगला बाजारभाव प्राप्त झाला होता. तसेच लाल कांद्याला 2020 मध्ये चांगला दर मिळाला मात्र तेव्हा लाल कांद्याची आवक ही खूपच कमी होती त्यामुळे ते दर तेव्हा वधारले होते.
Published on: 04 January 2022, 10:39 IST