News

कांद्याच्या बाजारभावात सातत्याने घसरण होताना पाहायला मिळत आहे. गेल्या सात दिवसांचा विचार केला तर जवळजवळ एक हजार रुपयांनी कांद्याचे दर घसरले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर येणाऱ्या एक दोन आठवड्यांमध्ये लाल कांद्याची आवक वाढण्याची शक्यता असून अजूनही भाव कमी होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. यामागे बरीचशी कारणे सांगता येतील.

Updated on 23 December, 2021 11:45 AM IST

कांद्याच्या बाजारभावात सातत्याने घसरण होताना पाहायला मिळत आहे. गेल्या सात दिवसांचा विचार केला तर जवळजवळ एक हजार रुपयांनी कांद्याचे दर घसरले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर येणाऱ्या एक दोन आठवड्यांमध्ये लाल कांद्याची आवक वाढण्याची शक्यता असून अजूनही भाव कमी होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. यामागे बरीचशी कारणे सांगता येतील.

महाराष्ट्रातील कांद्यावर दक्षिणेकडील राज्यांचा कांद्याचा प्रभाव

 दक्षिणेकडील कांदा उत्पादक राज्य जसे की, तामिळनाडू, कर्नाटक आणि आंध्रप्रदेश राज्यांमधून मोठ्या प्रमाणात कांदा महाराष्ट्रात दाखल होत आहे. जर आपल्या महाराष्ट्राचा कांद्याचा विचार केला तर महाराष्ट्रातील कांद्याची प्रतवारी सर्वात योग्य समजले जाते.महाराष्ट्रासह कर्नाटक,गुजरात, मध्यप्रदेश तसेच राजस्थानातील अलवर जिल्ह्यात कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते.दक्षिणेकडील राज्यांचा विचार केला तर आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि कर्नाटक या राज्यात कांदा लागवड केली जाते

परंतु दक्षिणेकडील राज्यांमध्ये कांद्याचे मोठ्या प्रमाणात लागवड झाली असल्याकारणाने येथील कांदा मोठ्या प्रमाणावर बाजारात दाखल झाला आहे. त्यामुळे आणि बाजारात कांदा शिल्लक राहत असून रोज कांदा दरात घसरण पाहायला मिळत आहे.तसेच आगामी काळात लाल कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होण्याची शक्यता असल्याने भाव आणखी कमी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

 लाल कांद्याचे टिकवणक्षमता कमी म्हणून..

 उन्हाळी कांद्याची काढणी केल्यानंतर त्याची साठवणूक करता येते परंतु लाल कांद्याची साठवणूक करता येत नसल्याने काढणी केल्यानंतर संपूर्ण कांदा हा विक्रीसाठी बाजारात न्यावा लागतो. त्यामुळे आता नवीन कांद्याचे काढणीसुरू झाल्याने येत्या एक दोन आठवड्यात लाल कांद्याची आवक वाढण्याची शक्यता असून त्याचा फटका परत कांदा भाव घसरण या  मध्येच होईल अशी भीती व्यक्त केली जात आहे.

English Summary: onion rate in markt continue decrease from few days many reason behind
Published on: 23 December 2021, 11:45 IST