सध्या कांदा बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याची आवक सुरू झाल्याने त्याचा परिणाम कांद्याचे दर घसरण यावर झाली.
राजस्थान, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश आणि गुजरात या राज्यांचा विचार केला तर या ठिकाणी तिकडचा स्थानिक कांदा मोठ्या प्रमाणात दाखल झाल्याने त्याचा परिणाम महाराष्ट्रातील कांद्याच्या मागणीवर झाला आहे. एवढेच नाही तर राज्यातील अहमदनगर,नाशिक आणि सोलापूर जिल्ह्यात देखील उन्हाळी कांद्याचे आवक सुरू झाल्याने कांद्याच्या दरात घसरण पाहायला मिळाली. जर नाशिक जिल्ह्यातील लासलगाव बाजार समिती चा विचार केला तर या ठिकाणी तब्बल प्रति क्विंटल साडे पाचशे रुपयांनी घसरण झाली.
लासलगाव बाजार समितीतील कांदा आवक आणि भाव
लासलगाव बाजार समितीमध्ये जर शनिवारचा विचार केला तर 17826 क्विंटल कांदा आवक झाली. तर भाव हे जास्तीत जास्त 2625 तर कमीतकमी 651 रुपये मिळाला. सरासरी भावाचा विचार केला तर तो 2100 रुपये प्रति क्विंटल मिळाला. शनिवारच्या तुलनेत सोमवारचा विचार केला तर बत्तीस हजार पाचशे क्विंटल कांद्याची आवक झाली. जास्तीत जास्त भाव हा 2077 तर कमीत कमी 900 तर सरासरी 1750 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला.जर आवक मध्ये सोमवारचा विचार केला तर 784 क्विंटल उन्हाळी कांदा दाखल झाला होता.
बऱ्याच दिवसापासून भावात सरासरीटिकून राहिलेला कांदा दोनच दिवसात साडे 500 रुपयांनी घसरला. परराज्यातील कांदा देखील डिसेंबर महिन्याच्या शेवटी बाजारपेठांमध्ये दाखल होतो परंतु यावेळेस फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी दाखल झाल्याने त्याचा परिणाम बाजार भावावर होत आहे.
Published on: 01 March 2022, 10:16 IST