News

कांदा लागवडीच्या बाबतीत नाशिक जिल्ह्याचा विचार केला तर जिल्ह्यात सर्वाधिक लागवड कांदा पिकाची केली जाते.नाशिक जिल्ह्यातील कळवण,सटाणा मालेगाव, देवळा तसेच येवला तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात लाल व रांगडा कांद्याची लागवड झालेली होती.

Updated on 17 March, 2022 9:09 PM IST

कांदा लागवडीच्या बाबतीत नाशिक जिल्ह्याचा विचार केला तर जिल्ह्यात सर्वाधिक लागवड कांदा पिकाची केली जाते.नाशिक जिल्ह्यातील कळवण,सटाणा मालेगाव, देवळा तसेच येवला तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात लाल व रांगडा कांद्याची लागवड झालेली होती.

बाजारपेठेमध्ये लाल  व  रांगड्या कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने बाजार भावात मोठी घसरण होत आहे. त्यामुळे घसरलेले कांद्याचे दर उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आणत आहेत. यातच भर म्हणून व्यापारी देखील अवकाळी चा फायदा घेत मनमानी व कमी भावाने कांदा खरेदी करत आहेत, शेतकऱ्यांचा आरोप असून व्यापाऱ्यांनी असे प्रकार न  थांबवल्यास महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेतर्फे तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

 मार्केटमध्ये कांद्याचे आवक मोठ्या प्रमाणात….

 मागे अवकाळी पाऊस झाल्यामुळे कांद्याचे आवरण उतरल्यामुळे कांदा लवकर खराब होण्याची शक्यता असते.त्यामुळे शेतकरीकांदा मोठ्या प्रमाणात लिलावासाठी बाजारपेठेत आणतात. परंतु शेतकऱ्यांच्या या परिस्थितीचा फायदा व्यापारी वर्गाने उचलण्याचे सत्र थांबवले पाहिजे.

जर सद्य परिस्थिती पाहिली तर अजूनही उन्हाळी कांद्याची आवक हवी तेवढी नाहीये.परंतु लाल व रांगड्या कांद्याची आवक वाढल्याने नाशिक जिल्ह्यातील जवळ जवळ सर्वच बाजार समित्यांमध्येअवकाळी चा फटका बसलेला रांगडा व गावठी कांदा मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येत आहे. परंतु व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट करण्यात येत आहे असा आरोप शेतकरी करीत आहेत.

 रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धजन्य परिस्थिती..

 सध्या रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू असल्याने सगळ्याच प्रकारच्या बाजारांमध्ये महागाईचा भडका उडाला आहे. परंतु कांद्याच्या बाबतीत मात्र नेमकी परिस्थिती उलटी आहे.यामध्ये कांद्याचे दर कमालीचे गडगडले आहेत.कांद्याच्या दरात अचानक पणे 14 ते 15 रुपये प्रति किलोने घट झाली आहे. कोरोनामुळे दोन वर्ष बाजारपेठा ठप्प होत्या.

बाजारपेठ असताना देखील शेतकरी शेतात राबराब राबत होता.त्यात कांदा उत्पादकदेखील मागे नव्हते.कोरोनाकाळात शेतकऱ्यांना त्याचा कांदा सरासरी पाच रुपये किलो विकावा लागला. आता कोरोणाचा प्रादुर्भाव कमी झाला व बाजारपेठा खुल्या झाल्या. मात्र तरीसुद्धा कांदा उत्पादकांच्या अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाहीत. कांद्याचे दर प्रति किलो आठ ते दहा रुपयांवर येऊन पोहोचले आहेत.

English Summary: onion rate decrease in market so farmer so anxiaty due to onion rate
Published on: 17 March 2022, 09:09 IST