सध्या कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात आहेत. कांद्याला बाजारभाव नसल्याने ते आक्रमक झाले आहेत. आता नाशिक (Nashik) जिल्ह्यातील कांदा उत्पादक भाव (Onion Rate) घसरल्याने व केंद्राच्या निर्यात, व्यापारविषयक धोरणामुळे संकटात आले आहेत. यामुळे शेतकरी बाजार वाढवण्याची मागणी करत आहेत.
यामुळे आता हे शेतकरी आंदोलन करत आहेत. मुंबई-आग्रा महामार्गावरील टेहरे हुतात्मा चौकात शेतकरी संघटनेतर्फे 'कांदा बाजार (Onion Market) स्वातंत्र्य अर्थाग्रह' या ब्रीद वाक्याने सत्याग्रह तिरडी आंदोलन करण्यात आले.
नाशिकमध्ये निफाड येथे कांद्याची मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे. मात्र दुसरीकडे नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कांदा उत्पादक शेतकरी असताना कांदा उत्पादकांना योग्य मोबदला नसल्याने अनेकदा आंदोलने केली जात आहेत. यासाठी केंद्र सरकार जबाबदार असल्याचे म्हटले जात आहे.
ब्रेकिंग! आता डिसेंबरपर्यंत मोफत रेशन मिळणार, 80 कोटी लोकांना होणार फायदा, मोदी सरकारची घोषणा
यामुळे शेतकरी संकटात आहेत. कांद्याबाबत योग्य धोरण ठरवा अशी मागणी केली जात आहे. यासाठी आता शेतकरी संघटना देखील नाराज आहेत. शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कांद्याच्या माळा बनवून गळ्यात घालून प्रतिकात्मक तिरडी खांद्यावर घेतली होती.
Corteva बीजप्रक्रियामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान लाँच करणार- डॉ. प्रशांत पात्रा
यामध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. केंद्राच्या निर्यात व्यापार विषयक धरसोडीच्या धोरणामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फायद्या ऐवजी नेहमी नुकसानीचा सामना करावा लागतो आहे. सध्या उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी संतप्त आहेत.
महत्वाच्या बातम्या;
शेतकरी का तोट्यात जातोय? औषधे आणि कीडनाशकांच्या किमतीवर लावलाय 18 टक्के जीएसटी
IoTechWorld Avigation 100% स्वदेशी ड्रोन बनवणार, शेतकऱ्यांना मिळणार फायदा, किंमतही येणार मापात
FRP पेक्षा जास्त दर, 'या' कारखान्याचे राज्यात कौतुक, शेतकऱ्यांना सुखद धक्का..
Published on: 29 September 2022, 05:07 IST