बाजारात फक्त कांद्याचे दर नाही तर भाज्यांचे दर सुद्धा शिगेला पोहचले आहेत. ठोक बाजारात भाज्यांचे दर नियंत्रणात आहेत पण किरकोळ बाजारात भाज्यांचे दर वाढले आहेत.मागील काही दिवसात हवामानात बदल आणि मोठ्या पाऊसामुळे भाज्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आणि त्यामुळे आता दर वाढले आहेत. सध्या सणासुदीचा सिजन चालू आहे त्यामुळे दर असेच राहतील असा अंदाज व्यक्त केला आहे. यावेळी बाजारात कांद्याला मोठी मागणी आहे मात्र पुरवठा कमी असल्याने दर वाढले आहेत.
किरकोळ बाजारात कांद्याचा दर ६० ते ७० रुपये प्रति किलो आहे.पावसामुळे भाज्यांचा पुरवठा शहरात झाला नसल्याने मागणी वाढली पण पुरवठा नसल्याने दर वाढले. देशातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ नाशिक ची आहे.नाशिक मधील कांदाचा पुरवठा दिल्लीत केला जातो. बाजारात फक्त कांदा च न्हवे तर भाज्यांचे दर सुद्धा वाढले आहेत जे की वाहतूक वेळेत होत नसल्याने शहरात दर वाढले आहेत.
नविन भाजीपाल्याची आवकही लांबणीवर:
पावसामुळे शेतामध्ये पाणी साचले गेले आणि भाजीपाला लागवडिसाठी उशीर झाला. आता पाऊस उघडला पण खूप उशीर झाला. बाजारात भाजीपाला उशिरा दाखल झाला त्यामुळे दिवाळी पर्यंत दर तसेच राहणार आहेत.
कांद्याचा भाव दुप्पट:-
नाशिक मधील लालसगाव बाजारपेठेत १६ सप्टेंबर रोजी कांदा १४.७५ रुपये किलो होता मात्र १६ ऑक्टोबर रोजी तो कांदा ३३.४० रुपये प्रति किलो वर गेला. बेंगळुरू येथील एपीएमसी मार्केटमध्ये कांद्याचे दर ८ सप्टेंबर रोजी १० रुपये वर होता तर १३ ऑक्टोबर रोजी कांद्याचा दर ३५ रुपये वर गेला. उत्तर कर्नाटकातील हुबळी मार्केटमध्ये १६ सप्टेंबर रोजी कांद्याचा दर ८.५० रुपये होता तर १६ ऑक्टोम्बर रोजी १४.५० रुपये झाला.
शेतकऱ्यांचे मरण व्यापाऱ्यांची चांदी:-
ठोक बाजारात कांद्याच्या किमती नियंत्रणात आहेत जे की व्यापारी वर्ग शेतकऱ्यांकडून २० ते २५ रुपये किलो ने कांदा विकत घेतात आणि किरकोळ बाजारात ६० ते ७० रुपये ने विकला जातो यामुळे शेतकऱ्यांचे तसेच ग्राहकांचे नुकसान होत आहे पण व्यापारी वर्गाची चांदी होत आहे.
Published on: 23 October 2021, 06:46 IST