सध्या बांगलादेशने आयातीवरील निर्बंध हटवल्याने कांदा दारात सुधारणा दिसून आली आहे. प्रतिक्विंटल मागे २०० ते २८० रुपयांपर्यंत सुधारणा झाल्याचे दिसून आले आहे. बाजारनिहाय आवक व प्रतवारीनुसार दर वेगवेगळे आहे.
उन्हाळ कांद्याच्या बाजारात शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या खाली कांद्याची विक्री करावी लागली. सोमवारी पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सर्वाधिक आवक होऊनही उन्हाळ कांद्याच्या दरात क्विंटलमागे ३०० रुपयांची वाढ दिसून आली.
मागील महिन्यात वादळी वाऱ्यासह पाऊस व गारपिटीमुळे अनेक भागात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे कांदा सडण्याचे भीतीपोटी शेतकऱ्यांनी माल बाजारात विकण्याची घाई केली. परिणामी दरावर परिणाम होता.
शिंदे-फडणवीस सरकारची नमो शेतकरी महासन्मान योजना फसवी!
सध्या शेतकऱ्यांनी कांदा साठवून ठेवल्यानंतर टप्प्याटप्प्यात चांगल्या प्रतवारीचा कांदा बाजारात येऊ लागल्याने दरात सुधारणा झाली. आता स्थिर आवक व वाढत असलेल्या मागणीमुळे दर वाढत आहेत.
मान्सूनची चिंता वाढली! २०१८ नंतर पहिल्यांदाच १० जून नंतर मान्सूनचं आगमन होणार..
दरम्यान, खरीप आणि लेट खरीप कांद्यानंतर उन्हाळ कांद्याच्या हंगामाच्या सुरुवातीपासून दरात अपेक्षित सुधारणा नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली. वादळी वाऱ्यासह पाऊस व गारपिटीने कांदा उत्पादक पट्ट्यात नुकसान आहे.
जगातील सर्वात महागडी म्हैस, किंमत आहे 81 कोटींहून अधिक, वाचा काय आहे खास..
शेतकऱ्यांनो लम्पी अजून गेला नाही काळजी घ्या, लातूरमध्ये लम्पी रोगामुळे 571 जनावरांचा मृत्यू, 133 गावात गावात बाधा
कमी पीककर्ज देणाऱ्या बँकांना बजावली नोटीस, सरकार आक्रमक...
Published on: 07 June 2023, 09:17 IST