News

देशातील बाजारात कांदा सामान्य ग्राहकांच्या डोळ्यातून पाणी काढत आहे. सर्वकडे कांद्याचे दर वधारले आहेत. दरम्यान सरकारच्या हस्तक्षेपानंतर दिल्ली, मुंबई आणि चेन्नईसारख्या प्रमुख बाजारात कांद्याची घाऊक किंमत १० रुपयांपर्यंत कमी झाली आहे.

Updated on 27 October, 2020 3:59 PM IST


देशातील बाजारात कांदा सामान्य ग्राहकांच्या डोळ्यातून पाणी काढत आहे. सर्वकडे कांद्याचे दर वधारले आहेत. दरम्यान सरकारच्या हस्तक्षेपानंतर दिल्ली, मुंबई आणि चेन्नईसारख्या प्रमुख बाजारात कांद्याची घाऊक किंमत १० रुपयांपर्यंत कमी झाली आहे. यंदा कांद्यालाही व्यवस्थापनाचा खूप  मार सहन  करावा लागला आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, १ लाख टन बफर साठ्यापैकी एक चतुर्थांश, म्हणजे २५ हजार टन कांदा व्यवस्थित  उपाययोजना  नसल्यामुळे कुजला.

हेही वाचा : ऐकलं का ! कांदा कापताना रडावं नाही लागणार; सुनिऑन्स कंपनीचा नवीन वाण 

नाफेडचे व्यवस्थापकीय संचालक एन.ए. चड्ढा म्हणाले की, कांदा जास्तीत जास्त  साडेतीन महिन्यांपर्यंत आपण घरी साठवू शकतो . यानंतर त्यामध्ये  सडण्यास सुरवात होते. आम्ही मार्च-एप्रिल महिन्यापासून बफर स्टॉकसाठी कांदा खरेदी करतो. पण आतापर्यंत सुमारे ६-७  महिने झाले आहेत.नाफेड केंद्र सरकारसाठी केवळ  बफर स्टॉकसाठी कांदा साठविते.एस के चड्ढा म्हणाले की, नाफेडने आतापर्यंत बाजारात ४३ हजार टन कांदा सोडला आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात ते सुमारे २२ हजार टन कांदे आणि बाजारात उतरतील. असा विश्वास आहे की त्यानंतर नाफेडचा साठा जवळजवळ संपेल, कारण ओलावाच्या अभावी २५ हजार टन कांदे खराब होतील.

हेही वाचा : कांदा दरवाढ: सरकारने घेतला मोठा निर्णय; साठवणूक मर्यादा ठरवली

दरवर्षी कांद्याची किंमत आकाशाला भिडते. अशा परिस्थितीत सरकार कांद्यासाठी बफर स्टॉक तयार करत आहे. मागील वर्षी नाफेडने ५७ हजार टन बफर स्टॉक तयार केला होता, त्यातील सुमारे ३० हजार टन कांद्याचे नुकसान झाले. त्यापेक्षा यावर्षी गोष्टी चांगल्या आहेत. यावर्षी कांद्याचा १ लाख टन साठा तयार झाला होता, त्यामध्ये केवळ २५  हजार टन कांदे वाया गेले आहेत.

English Summary: Onion prices likely to rise further, 25,000 tonnes of onions in the warehouse deteriorated
Published on: 26 October 2020, 05:42 IST