News

सध्या बाजारातील कांदा आवक कमी झाल्याने दरात चांगली सुधारणा दिसून आली. कांद्याला उठावही चांगला आहे. मागील आठवडाभारत कांदा भाव क्विंटलमागं ५०० ते ७०० रुपयांनी वाढले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

Updated on 11 August, 2023 1:52 AM IST

सध्या बाजारातील कांदा आवक कमी झाल्याने दरात चांगली सुधारणा दिसून आली. कांद्याला उठावही चांगला आहे. मागील आठवडाभारत कांदा भाव क्विंटलमागं ५०० ते ७०० रुपयांनी वाढले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

यंदा कांदा काढणीच्या अवस्थेत उष्णता आणि पावसामुळे कांदा पिकाची गुणवत्ता कमी झाली होती. कांदा जास्त दिवस टिकण्याची शक्यता नसल्याने शेतकऱ्यांनी कांदा विकला. अनेकांनी फुकट विकल्यासारखा कांदा विकला आहे.

जुलै महिन्यात पावसामुळे चाळीतील मालाचे नुकसान झाल्याचे शेतकरी सांगत होते. पाणी लागलेला कांदा जास्त दिवस टिकत नाही. हा कांदा मागील तीन आठवड्यांमध्ये बाजारात आला. आता चाळीतील कांद्याचे प्रमाण घटले.

दरम्यान, यापुढील काळात कांद्याची बाजारातील आवक कमी होत जाणार आहे, असेही व्यापारी सांगतात. चाळीतील माल कमी होत असल्याने बाजारातील टंचाई वाढण्याची शक्यता आहे.

यामुळे कांदा भावातही सुधारणा झाली. सध्या कांद्याला प्रतिक्विंटल सरासरी १ हजार ५०० ते २ हजार रुपयांचा भाव मिळत आहे. तर गुणवत्तेच्या कांद्याचा भाव काही बाजारांमध्ये २ हजार ५०० रुपयांवरही गेला.

'साखर कारखान्यांनी आर्थिक शिस्त आणावी, गैरव्यवहार टाळण्याची दक्षता घ्या, खरेदीमध्ये पारदर्शकता आणा'

English Summary: Onion price increased by Rs 500 to Rs 700 per quintal, relief to farmers...
Published on: 11 August 2023, 01:52 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)