मध्यप्रदेश मध्ये मागील काही दिवसांपासून कांद्याच्या भावा मध्ये तेजी पाहायला मिळत आहे.इंदोर मधील देवी अहिल्याबाई होळकर बाजारपेठेत शुक्रवारी कांद्याच्या भावात चारशे ते पाचशे रुपये प्रति क्विंटल पर्यंत वाढपाहायला मिळाली.मध्यप्रदेश मध्ये मागील काही दिवसांपासून कांद्याच्या भावा मध्ये तेजी पाहायला मिळत आहे.इंदोर मधील देवी अहिल्याबाई होळकर बाजारपेठेत शुक्रवारी कांद्याच्या भावात चारशे ते पाचशे रुपये प्रति क्विंटल पर्यंत वाढपाहायला मिळाली.
मध्यप्रदेश राज्यात मागील काही दिवसांपासून जोरदार पाऊस होत आहे. हेच कारण या भाववाढीमागे असल्याचे मानले जात आहे तसेच महाराष्ट्र मध्ये कांदा उत्पादन क्षेत्रामध्ये जास्त पाऊस आणि पुरामुळे कांदा उत्पादनावर परिणाम झाला आहे.त्यामुळे कांद्याच्या किमती वाढताना दिसत आहेत.
माहितीनुसार सुपर दर्जेदार कांदा 2800 रुपयांपर्यंत विकला गेला. अशामुळे कांद्याची आवक जवळजवळ पन्नास हजार गोणी इतकी होती.
सामान्य दर्जाच्या कांद्याला देखील चांगला भाव मिळत असल्याचे दिसत आहे.याबाबतीत व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की, पावसामुळे जास्त प्रमाणात कांद्याचे पिकाचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे भावात तेजी पाहायला मिळत आहे. तसेच महाराष्ट्रात पडलेला पाऊस आणि पुरामुळे जवळजवळ साठ टक्के कांद्याचे नुकसान झाले आहे. तसेच मध्य प्रदेश चा विचार केला तर पाऊस आणि पुरामुळे 40 ते 50 टक्के कांदा नष्ट झाला आहे. त्यामुळे व्यापार्यांचे म्हणणे आहे की येणाऱ्या काही दिवसांमध्ये कांद्याच्या भावात जास्तीची वाढ पाहायला मिळेल.
इतर पिकांच्या भावातही वाढ
तसेच बटाट्याची आवक मध्ये देखील सुधारणा होत आहे. मध्यप्रदेश बाजार समितीत बटाट्याच्या गोणी ची किंमत आठ हजार रुपये राहिली.लसणाची आवक स्थिर असूनत्याचीदेखील पाच ते सहा हजार रुपये प्रति गोणी आहे.
बटाट्याचे भाव
चिप्स ज्योती – आठशे ते हजार
राशन – 600 ते 700
गुल्ला – 400 ते 500
लसणाचे भाव
उंटी सुपर बोल्ड– पाच हजार ते पाच हजार पाचशे
बोल्ड – चार हजार ते चार हजार 500
Published on: 04 October 2021, 09:27 IST