राज्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन घेतले जाते. राज्यातील बहुतांशी शेतकऱ्याचे सर्व अर्थकारण हे कांदा पिकावर अवलंबून आहे. खरं पाहता कांदा हे एक नगदी पीक मात्र कॅश क्रॉप असून देखील कांदा विकून कॅश हातात येईल का नाही याबाबत कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नेहमीच संभ्रमावस्था असते. यामुळे कांदा पिकाला बेभरवशाचे पीक म्हणून ओळखले जाते.
कांद्याच्या दराचा यावर्षी देखील लहरीपणा कायम राहिला आहे. कांद्याच्या बाजारभावातला लहरीपणा हा काही नवीन विषय नाही मात्र यंदा सलग अडीच महिन्यांपासून कांद्याच्या दरात लहरीपणा बघायला मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या चिंतेत सापडला आहे.
कांद्याला मिळत असलेल्या कवडीमोल दरामुळे कृषी क्षेत्रातील जाणकार लोक वेगवेगळे विधान करत आहेत. काही तज्ञांच्या मते, श्रीलंकेमध्ये निर्माण झालेली दिवाळखोरी आणि बांगलादेश मध्ये अचानक निर्माण झालेली पैशांची कमतरता यामुळे कांद्याच्या दरावर मोठा विपरीत परिणाम होत आहे.
मित्रांनो कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांच्या मते, या दोन देशाची आर्थिक घडी विस्कटलेली असल्याने या देशात कांदा निर्यात केल्यास पैसे मिळतील की नाही याबाबत निर्यातदारास शाश्वती नाही त्यामुळे भारतीय निर्यात तर या देशांना मला पाठवत नाहीत. यामुळे निर्यात पूर्णपणे ठप्प झाली आहे.
निर्यात ठप्प झाली असल्याने देशांतर्गत बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात कांदा उपलब्ध झाला आहे. यामुळे आवक वाढली असून त्या प्रमाणात खपत होत नाहीये यामुळे कांद्याच्या दरात मोठी घसरण बघायला मिळत आहे. सध्या या दोन देशात सुरू असलेल्या आर्थिक तंगीमुळे कांद्याला 100 ते 200 रुपये प्रति क्विंटल एवढा कवडीमोल दर मिळत आहे. एकंदरीत काय तर या दोन देशांची विस्कटलेली आर्थिक घडी देशातील कांदा उत्पादकांसाठी जीवघेणी सिद्ध होत आहे.
Success: नोकरीला राम दिला आणि सुरु केला डेरी फार्मिंगचा व्यवसाय; आज करतोय लाखोंची कमाई
पाकिस्तानी कांदा देखील दर पाडण्यासाठी कारणीभूत
मित्रांनो खरं पाहता भारतीय कांद्याला वैश्विक पटलावर मोठी मागणी आहे. मात्र असे असले तरी पाकिस्तानी कांदा हा भारतीय कांद्यापेक्षा खूपच स्वस्त दरात विक्री होतो. यामुळे पाकिस्तानी कांद्याला सध्या मोठी बाजारपेठ मिळत आहे.
आणि यामुळेच भारतीय कांदा सध्या कवडीमोल दरात विक्री होत आहे. यावर्षी कांदा पिकासाठी पोषक वातावरण नव्हते मात्र तरीदेखील उन्हाळी कांद्याचे उच्चांकी उत्पादन बघायला मिळत आहे. यामुळे सर्वच बाजारपेठेत मोठी आवक आहे. म्हणून कांद्याच्या दरात गेल्या अडीच महिन्यांपासून मोठी घसरण बघायला मिळत आहे.
Pm Kisan Yojana: मोठी बातमी! कृषीमंत्र्यानी सांगितलं 'या' दिवशी मिळणार शेतकऱ्यांना दोन हजार
30 रुपये किलो कांदा घेण्यास तयार पण…!
मित्रांनो खरं पाहता श्रीलंकेतून कांद्याला 30 रुपये प्रति किलो दराने मागणी होत आहे. मात्र श्रीलंकेची सध्याची परिस्थिती पाहता पाठवलेल्या कांद्याचे श्रीलंकेतील व्यापारी पैसे पाठवतील की नाही याबाबत भारतीय निर्यातदारांना शाश्वती नाही. यामुळे भारतीय निर्यातदार श्रीलंकेत कांदा पाठवत नाहीत. एकंदरीत ज्या ठिकाणी मागणी आहे त्याठिकाणी जोखीम आहे आणि म्हणूनच व्यापाऱ्यांनी श्रीलंकेत कांदा पाठवण्यास पाठ फिरवली असून यामुळे भारतीय कांदा अतिशय कवडीमोल दरात विक्री होत आहे.
Health Tips: कच्च दुध पित असाल तर सावधान! आरोग्यावर होतात ‘हे’ घातक परिणाम
Published on: 23 May 2022, 02:35 IST