News

गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरात सातत्याने चढउतार होत आहे. सध्या कांद्याला दर नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. असे असताना आता दिल्ली आणि गुवाहाटी सारख्या काही शहरांमध्ये सरकार आपल्या बफर स्टॉकमधून सुमारे 50,000 टन कांदा उतरवणार आहे, जिथे कांद्याच्या किमती अखिल भारतीय सरासरी दरांपेक्षा किंचित जास्त आहेत.

Updated on 08 September, 2022 1:14 PM IST

गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरात सातत्याने चढउतार होत आहे. सध्या कांद्याला दर नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. असे असताना आता दिल्ली आणि गुवाहाटी सारख्या काही शहरांमध्ये सरकार आपल्या बफर स्टॉकमधून सुमारे 50,000 टन कांदा उतरवणार आहे, जिथे कांद्याच्या किमती अखिल भारतीय सरासरी दरांपेक्षा किंचित जास्त आहेत.

कांद्याचे भाव स्थिर ठेवण्यासाठी केंद्र सरकार 2.5 लाख टन कांद्याचा बफर स्टॉक ठेवत आहे. सूत्रांनी सांगितले की, ग्राहक व्यवहार विभाग आपल्या बफर स्टॉकमधून 50,000 टन कांदा दिल्ली आणि गुवाहाटी सारख्या शहरांमध्ये विकणार आहे. ते म्हणाले की अशी अनेक शहरे आहेत जिथे किमती अखिल भारतीय सरासरी दरांपेक्षा जास्त आहेत.

मंगळवारी कांद्याचा अखिल भारतीय सरासरी भाव 26 रुपये प्रति किलो होता. सूत्रांनी सांगितले की, विभागाने सर्व राज्यांना कांद्याची गरज असल्यास ऑर्डर देण्याचे पत्र लिहिले आहे. केंद्र कांद्याला प्रतिकिलो १८ रुपये दर देत आहे. 2020-21 मध्ये कांद्याचे उत्पादन 266.41 लाख टन आणि वापर 160.50 लाख टन होता.

गॅसच्या किमती कमी करून मोदी सरकार देणार सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट? घेतला मोठा निर्णय..

त्याचे नाशवंत स्वरूप आणि रब्बी आणि खरीप पिकांमधील फरक यामुळे सप्टेंबर ते डिसेंबर या छोट्या महिन्यांत कांद्याचे भाव वाढतात. यामुळे याचा शेतकऱ्यांना फायदा होतो. सध्या अनेक शेतकऱ्यांचे कांदे हे वखारीममध्ये पडून आहेत. दर नसल्याने कांदा खराब होण्याची शक्यता आहे.

'वारंवार सांगूनही माझ्या खात्यावर पैसे यायचे थांबत नाहीत आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांनी हेलपाटे घातले तरी त्यांचे पैसे येत नाहीत'

कांदा पिकाच्या काढणीनंतरच्या नुकसानीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी, विभागाने वैज्ञानिक समुदाय, संशोधक आणि स्टार्टअप्ससाठी एक हॅकाथॉन/ग्रँड चॅलेंज सुरू केले आहे, ज्याचा शोध काढणीनंतरच्या साठवणुकीसाठी प्रोटोटाइप विकसित केला जाऊ शकतो.

महत्वाच्या बातम्या;
शेतकऱ्यांनो लक्ष द्या! आज 'या' जिल्ह्यात अतिवृष्टी होणार! पंजाबरावांचा इशारा...
आयकरच्या धाडीनंतर अभिजीत पाटलांचा मोठा निणर्य, २ वर्षापासून थकीत असलेली 30 कोटींची बिलं देण्यास सुरुवात..
तुळशीच्या लागवडीने बदलले शेतकऱ्यांचे नशीब, आता स्वतःची कंपनी करणार सुरू

English Summary: Onion News: Modi government big step selling onions! Farmers
Published on: 08 September 2022, 01:14 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)