News

काही दिवसांपूर्वी कांद्याला चांगला बाजारभाव असताना आता मात्र यामध्ये मोठी घसरण झाली आहे. यामुळे आता उन्हाळी कांदा काढणीला आला आहे, मात्र दरात मोठी घसरण झाल्याने काय करायचे असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे. मार्च महिन्याच्या सुरवातील 3 हजार १00 रुपये प्रति क्विंटल असलेला कांदा याच महिन्याच्या अंतिम टप्प्यात 800 रुपयांवर आलेला आहे.

Updated on 25 March, 2022 2:11 PM IST

कांदा हा शेतकऱ्यांना कधी हसवतो तर कधी रडवतो. असे असताना आता असे काहीसे घडले आहे. काही दिवसांपूर्वी कांद्याला चांगला बाजारभाव असताना आता मात्र यामध्ये मोठी घसरण झाली आहे. यामुळे आता उन्हाळी कांदा काढणीला आला आहे, मात्र दरात मोठी घसरण झाल्याने काय करायचे असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे. मार्च महिन्याच्या सुरवातील 3 हजार १00 रुपये प्रति क्विंटल असलेला कांदा याच महिन्याच्या अंतिम टप्प्यात 800 रुपयांवर आलेला आहे.

सध्या खरिपातील लाल कांदा आता अंतिम टप्प्यात आहे. असे असतानाच उन्हाळी हंगामातील कांद्याची आवक सुरु झाली आहे. महिन्यापूर्वी ज्या शेतकऱ्यांनी कांदा विक्री केला आहे त्यांना चांगले पैसे मिळाले आहेत. अनेकांनी अजून दर वाढतील म्हणून साठवणुकीकडे कल दिला, मात्र त्यांचे गणित फसले. सध्या त्यामुळे कांद्याचे दर केव्हा सुधारणार हाच मोठा प्रश्न आहे.

तसेच कांदा साठवायचा असेल तरी ढगाळ वातावरणामुळे कांदा वावरात ठेवणेही धोक्याचेच आहे. यामुळे तो भिजून काहीच हाती लागणार नाही, अशी भीती देखील शेतकऱ्यांमध्ये आहे. सध्या मागणीच नसल्याचा हा परिणाम असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. पुणे जिल्ह्यातील खेड बाजार समितीमध्ये जी परस्थिती तीच सोलापूर आणि लासलगाव मार्केटमध्ये आहे. सगळीकडे एकच परिस्थिती आहे.

यामुळे आता कांदा दराचा लहरीपणा शेतकऱ्यांसाठी नुकसानीचा ठरत आहे. कांद्याच्या मुख्य बाजारपेठांमध्ये सध्या सर्वसाधारण अशीच कांद्याची आवक सुरु आहे. खेड येथील समितीच्या महात्मा फुले मार्केट मध्ये कांद्याची 20 हजार कट्ट्यांची आवक झाली होती. ही आवक अधिकची नसतानाही कांद्याला केवळ 900 ते 1 हजार 300 असा दर मिळाला आहे. यामुळे आता उत्पादन खर्च मिळवणे देखील अवघड झाले आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडलेली आहे. अजून उन्हाळी कांदा वावरामध्ये आहे पण सध्या सुगीचे दिवस असल्याने काढणी रखडलेली आहे. उद्या आवक वाढली तर कांदा दराचे काय होणार याची धास्ती शेतकऱ्यांना लागली आहे. सध्या शाळा देखील पूर्णपणे सुरु नाहीत, शाळा व्यवस्थित सुरु झाल्यानंतर कांद्याचे दर वाढतील असा अंदाज आहे.

महत्वाच्या बातम्या;Watermelon; शेतकऱ्यांनो तुमचा माल तुम्हीच विका, कशाला कोणाची धन करता? वाचा सगळं गणित...
आता शिल्लक राहिलेल्या उसाला ५० हजारांचे अनुदान मिळणार? निर्णयाकडे शेतकऱ्यांचे लागले लक्ष..
दुःखद! बैलगाडा शर्यत जिंकली पण शर्यतीत अपघात होऊन गाडामालकाचा मृत्यू, परिसर हळहळला..

English Summary: Onion Market; Farmers, you save and consumers buy now, a big drop in onion prices
Published on: 25 March 2022, 02:11 IST