Nashik News : केंद्र सरकारने कांदा निर्यातशुल्क लागू केल्यापासून कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापारी अडचणीत सापडले आहेत. शेतकऱ्यांचे मात्र मोठं नुकसान झाले आहे. तर मागील काही दिवसांपूर्वी नाशिक जिल्ह्यातील कांद्याचे लिलाव 13 दिवस बंद होते. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. मात्र आता राज्यभरातील कांदा बाजार समितीत कांद्याच्या आवकेत घट दिसून येत आहे. मात्र दर स्थिर असल्याचे दिसून आले आहे.
आशियातील सर्वांत मोठी म्हणून कांदा बाजार पेठ असलेल्या लासलगाव बाजार समितीत कांद्याची आवक कमी होऊ लागली आहे. आज (दि.13) बाजार समितीत कांद्याची आवक 7424 (टन) झाली तर सर्वसाधारण दर हा 2500 रुपये मिळाला.
महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ वेबसाईटवरील आकडेवारीनुसार..बाजारातील आवक आणि दर
लासलगाव - दिनांक - कांदा आवक (टन) - कमीत कमी दर- जास्तीत जास्त - सर्वसाधारण
लासलगाव- 13/10/2023 - 7424 - 900 - 2870 - 2500
लासलगाव - 12/10/2023 - 11776- 1000 - 2901 - 2520
लासलगाव- 11/10/2023 - 11358 - 801 - 2781 - 2470
लासलगाव- 10/10/2023- 13622- 900- 2700- 2410
लासलगाव - 09/10/2023- 14048- 1000- 2681- 2360
सोलापूर - दिनांक - कांदा आवक (टन) - कमीत कमी दर- जास्तीत जास्त - सर्वसाधारण
सोलापूर 13/10/2023- 12335- 100 - 3300- 1650
सोलापूर - 12 /10/2023 - 1126 - 100- 3100 - 1600
सोलापूर- 11/10/2023 - 15732 - 100 - 3000 - 1600
सोलापूर- 10/10/2023 - 6438- 100 - 3100 - 1750
सोलापूर - 09/10/2023 - 17981- 100 - 3100 - 1700
"आज कांदा बाजार भाव पाच हजार पाहिजे होते. आजच्या भावात खर्च पण वसूल होत नाही. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे खूप नुकसान झालं. खर्च पण वसूल झाले नाहीत."
संदीप मगर, कांदा उत्पादक शेतकरी, देवळा
"सध्या जो दर मिळत आहे तो दर शेतकऱ्यांना परवडणारा नाही. कांदा साठवणूक करून 6 महीने झाले. घट,सड, यांचा तुलनात्मक विचार केला तर उत्पादन खर्च पण निघत नाही. सध्या शेतकरी वर्गाला अपेक्षित दर मिळत नाही."
संदीप कोकाटे, कांदा उत्पादक शेतकरी, येवला, नाशिक
Published on: 13 October 2023, 04:10 IST