Nashik News : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नाशिक येथील पिंपळगाव बसवत येथील सभेत गोंधळ घालणाऱ्या तरुणाने शरद पवार यांची नाशिक येथे भेट घेतली आहे. पोलिसांनी अटक केल्यानंतर जामिनावर सुटका झाल्यानंतर नाशिक येथील एमराल्ड पार्क हॉटेलमध्ये या तरुणाने शरद पवारांची भेट घेतली आहे. किरण सानपने असं या तरुणाच नाव आहे.
नाशिक येथे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ (दि.१६) रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची जाहीर सभा नाशिकच्या पिंपळगाव बसवंत येथे पार पडली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत असताना संबंधित तरुणाने कांद्यावर (Onion) बोला असे म्हणत जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे सभेस्थळी काही वेळ गोंधळ निर्माण झाला. त्यानंतर घोषणाबाजी करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
संबंधित तरुणाचे शरद पवारांकडून कौतुक
मोदींना कांद्यावर बोला असे तरुण शेतकर्यांनी प्रश्न विचारला तर तो योग्यच आहे. पंतप्रधान मोदींनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घ्यायला पाहिजेत. अनेक दिवसांपासून कांदा निर्यातबंदी असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. यामुळे तरुणाने केलेला प्रश्न योग्यच आहे. किरण सानप हा माझ्या पक्षाचा आहे का तर माहीत नाही. मात्र असेल तर त्याचा मला अभिमान आहे, अशा शब्दात शरद पवारांनी या तरुणाचं कौतुक केलं आहे.
नेमकं सभेस्थळी झालं काय?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सुरु होते. तेव्हा संबंधित तरुण मोदींच भाषण सुरुवातीपासून ऐकत होता. पण मोदी हिंदुत्व, मुस्लीम यावर बोलत. त्यावर संबंधित तरुणाचा काही वेळानंतर बांध फुटला आणि या तरुणाने कांद्यावर बोला म्हणून घोषणाबाजी सुरु केली, अशी माहिती स्वत: तरुणाने दिली आहे. त्यावर काही वेळातच मोदींना कांद्यावर बोलावं लागलं.
दरम्यान, नरेंद्र मोदींच्या सभेत गोंधळ घालणारा हा तरुण राष्ट्रवादी शरद पवार गटाचा आहे. किरण सानप हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचा आयटी सेलचा पदाधिकारी देखील आहे. हा तरुण गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी चळवळीत काम करत आहे.
Published on: 18 May 2024, 11:53 IST