निर्सगाच्या लहरी प्रमाणे कांद्याचे दर हे कमी जास्त होत असतात. पण आता पुष्पा चित्रपटाला डायलॉग प्रमाणे कम नहीं होगा साला कांदा..! अशी म्हण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्रात कांद्याची आवक वाढली आहे, मात्र कांद्याचे दर स्थिर आहेत. कांद्याची आवक वाढूनही दर कमी होत नसल्याने यामध्ये केंद्र सरकारलाच (Central Government) हस्तक्षेप करावा लागला आहे.
महाराष्ट्रात राज्यातील लासलगाव आणि पिंपळगाव बाजार समितीमध्ये कांदा आवकही सुरु झाली आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये दरात सुधारणा झाली असून प्रति क्विंटल सरासरी 3 हजार 500 रुपये दर मिळत आहे. लासलगाव पाठोपाठ सर्वात मोठी असलेल्या बाजारपेठेत कांद्याची आवक सध्या कमी झाली असली तरी दर मात्र टिकूण आहेत.
हेही वाचा - आनंदाची बातमी: 8 फळपिकांसाठी विमा योजना, राज्य सरकारचा मोठा निर्णय
मोठी बातमी : ७/१२ उताऱ्यावरुन पोटखराबा नोंदी होणार गायब; सरकारचा मोठा निर्णय
कांदा दराबाबत केंद्र सरकारचा निर्णय
गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दारात वाढ होत आहे. आवक वाढली मात्र कांद्याचे दर काही कमी झाले नाहीत. या मध्ये केंद्र सरकारने हस्तक्षेप केला आहे. कांद्याचे दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने राज्यातील काही बाजार समित्यांना टार्गेट करीत साठवणूकीतला कांदा थेट या बाजार समित्यांना पुरवण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे दर कमी होतील असे चित्र होते. पण सोलापूरातील मार्केटमध्ये दर टिकूनच नाही तर यामध्ये वाढ होत आहे. क्विंटलपासून 3 हजार 500 पर्यंतचा दर सोलापूर येथील बाजार समितीमध्ये मिळत आहे. कांदा साठवणूकीची क्षमता यामुळे शेतकऱ्यांचा विश्वास दिवसेंदिवस वाढत आहे.
हेही वाचा - Google pay Loan : फक्त एका क्लिकवर मिळणार 1 लाखांपर्यंतचे कर्ज ! असा करा अर्ज आणि घ्या लाभ
पंतप्रधान पीक विमा योजना शेतकऱ्यांपेक्षा कंपन्यांसाठीच ठरली फायद्याची; धक्कादायक माहिती आली समोर
Published on: 22 February 2022, 01:54 IST