खरीप हंगाम असो किंवा रब्बी हंगाम असो कांद्याचे क्षेत्र हे मुख्य आगारात वाढतेच हे ठरलेले आहे. उन्हाळी हंगामात सुद्धा कांद्याचे क्षेत्र वाढलेले आहे. उत्पादन वाढावे म्हणून शेतकरी आपल्या शेतात वेगवेगळे प्रयोग करत असतात परंतु यंदा निसर्गाचा लहरीपणा शेतकऱ्यांचे नुकसानीचे कारण बनले आहे. मागे कडाक्याची थंडी पडल्यामुळे शेतकऱ्याना द्राक्षेच्या बागेत जाऊन शेकोट्या पेटवाव्या लागल्या होत्या तसेच कांद्यावर सुद्धा धुके पडले होते. आता कुठेतरी उन्हाळा सुरू झाला असल्याने तापमानात वाढ झालेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता व आता पुन्हा थंडी पडली असल्याने कांदा उत्पादकांमध्ये चिंता वाढली आहे. धुक्यामुळे कांद्यावर माव्याचा प्रादुर्भाव तसेच करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढतच आहे.
शेतकऱ्यांसाठी काय आहे सल्ला?
थंडी तसेच धुक्यामुळे कांद्यावर मावा आणि करपा रोगाचा प्रादुर्भाव पडत होता जे की यासाठी मोठ्या प्रमाणात खते व औषधांचा वापर करावा लागत होता. उत्पादन खर्चात सुद्धा वाढ होत आहे तसेच धुके पडल्याने दवबिंदू पडले की कांद्याची पात खराब होते त्यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होते. नुकसान टाळण्यासाठी सकाळी सकाळी कोरडा कपडा पातीवरून फिरवावा म्हणजे पात खराब होत नाही. यामुळे कांद्याचे उत्पादनही घटत नाही आणि उत्पन्न ही वाढते.
तापमानात चढ-उतार, पिकांना धोका :-
मागील काही दिवसांपासून तापमानात वाढ झाली असल्यामुळे रब्बी हंगामातील पिकांना पोषक वातावरण भेटले आहे त्यामुळे पिके जोमात वाढत आहेत. या पोषक वातावरणाचा उत्पादनावर परिणाम होत असल्याची चर्चा रंगलीच होती तो पर्यंत थंडीत वाढ झाली. तापमानात घट झाली असल्याने पिकांना धोका वाढत आहे. विशेष म्हणजे कांदा पिकावर करपा आणि मावा रोगाचा प्रादुर्भाव पडत आहे तर द्राक्षे तोडणी अंतिम टप्यात असल्यामुळे नुकसान टळले आहे. थंडीत रब्बी चे पीक जोमात वाढते मात्र जास्त थंडी पडली की पिकांचे नुकसान होते.
निफाड तालुक्यात पहिल्या आठवड्यात तापमानाचा पारा घसरला जे की तेथील तापमान ३ ते ४ अंश झाले असल्याने नागरिकांना शेकोट्या पेटवाव्या लागल्या. फक्त एवढेच नाही तर कडाक्याची थंडी पडल्यामुळे द्राक्षांना तडे जातील त्यासाठी शेतकरी रात्री बागेत शेकोट्या पेटवत असत आणि द्राक्षांना आबा देत असत. पुन्हा एकदा तीच परिस्थिती निर्माण झाली असल्यामुळे निफाड परिसरात पुन्हा शेकोट्या पेटू लागल्या आहे. काही टप्यात द्राक्षाची तोडणी झाली आहे.
Published on: 13 February 2022, 02:05 IST