News

काळाच्या ओघात दिवसेंदिवस शेतीमालाची मोठी निर्यात होत असल्याने परकीय चलनाचा शेतकऱ्याना मोठा फायदा होत आहे. खाद्यपदार्थ तर आहेतच पण त्यासोबत धान्य, भाजीपाला, फुले, फळांच्या निर्यातीमध्ये सुद्धा लक्षणीय वाढ होत आहे. शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे तसेच विविध प्रकारचे प्रयोग करून शेतीमध्ये अधिकाधिक उत्पादन घेतले जात आहे. मागील ९ वर्षांपासून कांदा निर्यातीमध्ये तर खूप मोठा बदल झालेला आहे जे की २०१३ पासून ४८७ टक्के नी कांदा निर्यात वाढली आहे. कांदा निर्यातीमध्ये महाराष्ट्र राज्याचा मोलाचा वाटा आहे. ४८७ टक्के नी कांदा निर्यातीमध्ये वाढ झाली असल्यामुळे जगात नाव गाजले आहे. एका बाजूला निसर्गाचा लहरीपणामुळे तर दुसऱ्या बाजूला कांद्याचे दर भेटले आहेत.

Updated on 15 February, 2022 5:14 PM IST

कांदा उत्पादनात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर :-

दरवर्षी भारतात सुमारे २०० दशलक्ष टन कांद्याचे उत्पादन घेतले जाते. दरवर्षी सर्व देशांना भारत कांदा निर्यात करत असतो ने की कांदा उत्पादनात महाराष्ट्र राज्याचा पहिला नंबर लागतो. तर दुसऱ्या क्रमांकावर गुजरात आणि त्यानंतर हरियाणा, ओडिशा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान या राज्यांमध्ये कांद्याचे उत्पन्न घेतले जाते. सर्वाधिक कांद्याचे उत्पादन घेणारे महाराष्ट्र राज्य यावेळी सुद्धा कांदा उत्पादनात अग्रेसर आहे. उन्हाळी हंगामात कांद्याची आवक ३० टक्के नी वाढलेली आहे. जर केंद्र सरकारने निर्यात धोरणामध्ये कोणता बदल केला नाही तर शेतकऱ्यांना याचा नक्की फायदा होईल.

कांदा निर्यातीमध्ये नवे विक्रम :-

मागील काही वर्षांमध्ये भारतात कृषी क्षेत्राशी निगडित विविध विक्रम झालेले आहेत. मागील महिन्यात वाणिज्य मंत्रालयाने म्हणले आहे की कृषी क्षेत्रात यावेळी नवे विक्रम प्रस्थापित होत आहेत. तसेच मंत्रालयाने दिलेल्या अहवालानुसार चालू वर्षी आर्थिक स्थिती चा अभ्यास करता कृषी निर्यातीमध्ये भारताची पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात निर्यात झालेली आहे जे की यामुळे शेतकऱ्यांना चांगले पैसे सुद्धा भेटले आहेत. भारताचे यावेळी जागतिक पातळीवरील बाजारपेठेत एक वेगळेच स्थान निर्माण झालेले आहे. असेच निर्यातीमध्ये कायम लक्षणीय वाढ होत गेली तर नकाशात भारताला कृषी क्षेत्रात ओळखले जाणार आहे.

कांदा लागवड क्षेत्रात लक्षणीय वाढ :-

भारत देश सर्व देशांना कांदा निर्यात करत असतो जे की भारतातील महाराष्ट्र राज्यात सर्वात जास्त कांद्याचे  उत्पादन घेतले  जाते. उन्हाळ्यात  कांद्याची  लागवड  केल्याने  ३०  टक्के जास्त उत्पादन वाढले आहे तर २०१३ पासून लहान कांद्याच्या उत्पादनामध्ये ४८७ टक्के नी वाढ झालेली आहे. यावर्षी  भारताची  कृषी क्षेत्राशी आर्थिक  स्थिती  पाहता जागतिक  स्तरावर  भारताची ओळख निर्माण झालेली आहे. महाराष्ट्र राज्याबरोबरच हरियाणा, ओडिशा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान  या राज्यात सुद्धा कांद्याचे  मोठ्या  प्रमाणात उत्पन्न घेतले जात आहे जे की दिवसेंदिवस यामध्ये वाढच होत चालली आहे.

English Summary: Onion Exports India's Global Market Identity, Onion Growth by 487 Percent Since 2013
Published on: 15 February 2022, 05:13 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)