News

केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा निर्णय लागू केल्यानंतर कांदा उत्पादक शेतकरी प्रचंड आक्रमक झाले आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी रास्तारोको केला आहे. आज (दि.११) रोजी शरद पवार यांच्या उपस्थितीत चांदवडमध्ये रास्तारोको आणि सभेचं आयोजन करण्यात आले आहे.

Updated on 11 December, 2023 11:24 AM IST

Nashik Onion News : केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी पुन्हा लागू केली आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत. कांदा दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्राने निर्यातबंदीचा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार स्वत: आता कांदा उत्पादकांसाठी मैदानात उतरले आहेत.

केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा निर्णय लागू केल्यानंतर कांदा उत्पादक शेतकरी प्रचंड आक्रमक झाले आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी रास्तारोको केला आहे. आज (दि.११) रोजी शरद पवार यांच्या उपस्थितीत चांदवडमध्ये रास्तारोको आणि सभेचं आयोजन करण्यात आले आहे. यासाठी स्वत: शरद पवार उपस्थित राहणार आहेत. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठिशी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद असल्याचे चित्र दिसून आलं आहे. तसंच आंदोलनस्थळी शरद पवार यांचे बॅनर देखील लावण्यात आले आहेत.

कांदा प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज (दि.११) आणि नाशिकमधील कांदा यांच्यासह दिल्लीत बैठक पार पडणार आहे. या बैठकीतून कांद्यावर तोडगा काढला जाणार आहे. कांदा निर्यातबंदीचा निर्णय लागू केल्यानंतर नाशिकमधील कांदा बाजार बंद आहे. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. कांदा उत्पादकांनी केंद्रीय मंत्री भारती पवारांच्या नाशिकमधील घराबाहेर ठिय्या आंदोलन केलं होतं. त्यामुळे आज दिल्लीत होणाऱ्या बैठकीत कांदा प्रश्नावर काय तोडगा निघतो? हेही पाहणं महत्त्वाचं आहे.

दरम्यान, केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी करण्याचा निर्णय घेतल्याने सध्या कांद्याला कमी दर मिळत आहे. परिणामी काही शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील निघत नाही. त्यात केंद्र केंद्र सरकारच्या या निर्यातबंदीच्या निर्णयामुळे राज्यभरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संताप पाहायला मिळत आहे.

English Summary: Onion Export Ban Sharad Pawar in Maidan for Onion Producer Rastraroko in the presence of Pawar
Published on: 11 December 2023, 11:24 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)