News

शेतकऱ्यांना कांदा खरेदीचा भाव २४१० रुपये मिळणे अपेक्षित होते. पण प्रत्यक्षात मात्र आज या ठिकाणी ज्यावेळी लिलाव सुरू झाले. त्यावेळेला शेतकऱ्यांना २००० ते २१०० भाव देण्यात आला.

Updated on 01 September, 2023 11:08 AM IST

Nashik Onion Update News :

नाशिक जिल्ह्यात कांदा उत्पादक शेतकरी आता पुन्हा आक्रमक झाले आहेत. आक्रमक शेतकऱ्यांनी कांद्याचे लिलाव बंद पडलेले आहेत. चांदवड, लासलगाव पिंपळगाव आणि येवला बाजार समितीत शेतकऱ्यांनी कांदा लिलाव बंद पाडला आहे. नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्या उपस्थित (दि.२३) रोजी बैठक पार पडली होती. त्यावेळी नाफेडमार्फेत २४१० रुपयांनी शेतकऱ्यांचा कांदा खरेदी केला जाईल, असं स्पष्ट करण्यात आले होते. पण तसं झालं नाही. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांनी कांदा मार्केट बंद पाडले आहे.

शेतकऱ्यांना कांदा खरेदीचा भाव २४१० रुपये मिळणे अपेक्षित होते. पण प्रत्यक्षात मात्र आज या ठिकाणी ज्यावेळी लिलाव सुरू झाले. त्यावेळेला शेतकऱ्यांना २००० ते २१०० भाव देण्यात आला. त्यामुळे शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा आक्रमक लिलाव बंद पाडले. चांदवड, लासलगाव, पिंपळगाव आणि येवला बाजार समितीत हे लिलाव बंद आहेत.

सकाळी कांदा लिलाव सुरू झाल्यानंतर बाजार अपेक्षित दर न मिळाल्याने आणि खरेदीसाठी नाफेडचे अधिकारी नसल्याने शेतकऱ्यांनी तात्काळ कांदा लिलाव बंद केले. तसंच सरकारच्या वतीने नाफेडचे अधिकारी कांदा खरेदीला उपस्थित असणे गरजेचे होते. पण अधिकारीही नव्हते. त्यामुळे शेतकरी आक्रमक झाले.

दरम्यान, साधारणता सध्या कांद्याला तीन ते चार हजार रुपयांचा दर अपेक्षित हवा होता. तसंच आज बाजारात कांदा खरेदीसाठी कांदा आल्यानंतर नाफेड अधिकारी नव्हते. आणि दर देखील २४१० रुपये पेक्षा कमी होता. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत, अशी प्रतिक्रिया शेतकरी देत आहेत.

English Summary: Onion auction in Lasalgaon Pimpalgaon Yewla Chandwad closed Farmers again aggressive
Published on: 24 August 2023, 11:00 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)