Nashik News : नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांचा मागील १३ दिवसांपासून लिलाब बंद असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होतं आहे. यामुळे शेतकरी हित जपण्यासाठी लासलगाव बाजार समिती अंतर्गत येणाऱ्या विंचूर आणि निफाड उपबाजार समितीत कांद्याचे लिलाव सुरु झालेत. तसंच ५ तारखेपर्यंत लासलगाव बाजार समितीत देखील कांद्याचे लिलाव सुरु होण्याची शक्यता आहे.
केंद्र सरकारने लागू केलेले कांदा निर्यातशुल्क रद्द करावे, या मागणीसाठी नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांनी लिलाव बंद केले आहेत. तसंच संपूर्ण देशात विक्रेत्याकडून चार टक्के आडत घ्यावी. देशांतर्गत वाहतुकीवर सरसकट ५० टक्के सबसिडी व्यापाऱ्यांना देण्यात यावी, या मागण्यांसाठी लिलाव बंद ठेवण्यात आले होते.
मात्र लासलगाव बाजार समिती अंतर्गत येणाऱ्या विंचूर आणि निफाड या उपबाजार समितीत कांद्याचे लिलाव सुरु झाले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना काहीसा मिळाला आहे. पण व्यापाऱ्यांमध्येच ऐकी नसल्याचं यातून दिसून येत आहे.
येत्या ५ तारखेला आशियातील सर्वात मोठी असलेली बाजार समितीत लासलगाव देखील सुरु होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मागील १३ दिवसांपासून कांदा लिलाव बंद शेतकऱ्यांच्या साठवणूक कांद्याचे नुकसान होऊ लागले आहे.
दरम्यान, कांदा लिलाब बंद असताना अनेक विविध पातळ्यांवर बैठका पार पडल्या. मात्र मागण्या मान्य होत नसल्याने व्यापारी माघार घेण्यास तयार नव्हते. त्यामुळे दररोजचे जवळपास ३० कोटी रुपयांची उलाढाल थांबली होती. प्रशासनाने तात्पुरते परवाने देऊन व अन्य जिल्ह्यातील व्यापाऱ्यांना लिलावात उतरवून बाजार समित्यांना पर्यायी व्यवस्था उभारण्याचे निर्देश दिले होते.
Published on: 02 October 2023, 04:40 IST