Nashik News : केंद्र सरकारने कांदा निर्यातशुल्क लागू केल्यापासून कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापारी अडचणीत सापडले आहेत. शेतकऱ्यांचे मात्र मोठं नुकसान झाले आहे. तर मागील काही दिवसांपूर्वी नाशिक जिल्ह्यातील कांद्याचे लिलाव १३ दिवस बंद होते. मात्र आता पुन्हा नाशिक जिल्ह्यातील कोणतीना कोणती बाजार समिती बंद राहत आहे. आज (दि.१३) रोजी उमराणा कांदा बाजार बंद आहे. तर लासलगाव बाजार समितीत देखील कांद्याची आवक स्थिर आहे.
आशियातील सर्वांत मोठी म्हणून कांदा बाजार पेठ असलेली लासलगाव बाजार समितीत आज (दि.१३) कांद्याची आवक स्थिर झाली आहे. आज बाजारात सरासरी कांद्याला २३०० ते २४०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. काल (दि.१२) रोजी २४०० ते २५०० रुपये होता. आज मात्र सरासरी कांदा दरात घसरण झाली आहे.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मागील सहा महिन्यांपासून कांदा चाळीत साठवण केली आहे. मात्र काही ना काही कारणांनी बाजारात अडचणी निर्माण होत आहेत. दर मिळत नाहीत आणि त्यात कांदा निर्यातशुल्क लावले आहे. यामुळे उत्पादक शेतकरी अडचणीत आहेत. तसंच चाळीत साठवणूक करुन ठेवलेला कांदा देखील सडला असल्याने आणि त्यात घट झाली असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तस पाहता शेतकऱ्यांनी कांदा उत्पादनासाठी केलेला खर्च देखील आजच्या स्थितीत निघणे मुश्किल झाले आहे.
क्रिसील संस्थेच्या रिपोर्टमुळे कांदा निर्यातशुल्क?
क्रिसिल ही एक जबाबदार संस्था आहे. क्रिसिलने सप्टेंबर महिन्यात कांद्याचे दर ६० ते ७० रुपये किलोवर जातील, असा रिपोर्ट सादर केला. यामुळे केंद्र सरकारने पुढील काही दिवसांतच कांद्यावर ४० टक्के निर्यातशुल्क लावले. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान तर झालेच. तसंच क्रिसीलने सादर केलेल्या अहवालानुसार बाजारात कांद्याचे दर ६० ते ७० रुपयांवर पोहचले नाहीत. तसंच पुरवठाही सुरळीत होता. यामुळे संस्थेने सादर केलेला अहवाल पूर्णता फेल ठरल्याचं दिसून आलं आहे. तसंच हा रिपोर्टपाहून सरकारने कांदा निर्यातशुल्क लागू केले का? असा प्रश्न यावेळी उपस्थित होतो.
"सध्या जो दर मिळत आहे तो दर साठवणूक करून कांदा ६ महीने झाले. घट,सड,यांचा तुलनात्मक विचार केला तर उत्पादन खर्च पण निघत नाही. सध्या शेतकरी वर्गाला अपेक्षित दर मिळत नाही."
संदीप कोकाटे- कांदा उत्पादक शेतकरी, येवला-नाशिक
Published on: 13 October 2023, 10:57 IST