टोमॅटो (tomato) 500 रुपये किलो, कांदा (Onion) 400 रुपये किलो आणि बटाटा 120 रुपये किलो. घाबरू नका, हे दर भारताचे नसून पाकिस्तानचे आहेत. सध्या पाकिस्तानात आलेल्या पुराच्या कहरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. श्रीलंकेनंतर आणखी एक शेजारी देश पाकिस्तानला (Pakistan) महागाईचा सामना करावा लागत आहे.
पाकिस्तानात नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) गेल्या महिनाभरात फळे आणि भाज्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. पाकिस्तानातील सिंध आणि बलुचिस्तान भागात गेल्या तीन महिन्यांपासून सतत पाऊस पडत आहे.
लाहोरच्या (Lahor) स्थानिक बाजारपेठेत टोमॅटो आणि कांद्याला अनुक्रमे ५०० आणि ४०० रुपये दर मिळाला. पाकिस्तानमधील चढे भाव कमी करण्यासाठी पाकिस्तान सरकार भारतातून टोमॅटो आणि कांद्याची आयात करण्याची प्रक्रिया करत आहे. आयातीमुळे पाकिस्तानला फळे आणि भाज्यांच्या चढ्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल.
मुसळधार पावसातून वाचलेल्या सोयाबीनवर केवडा रोगाचा प्रादुर्भाव; असा करा बचाव
भारतातील (India) दक्षिणेकडील राज्ये आणि डोंगराळ राज्यांमध्ये, टोमॅटोच्या काढणीचा कालावधी ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये असतो. या अतिरिक्त निर्यातीमुळे टोमॅटो आणि कांद्याच्या देशांतर्गत किमती सुधारण्यास मदत होणार आहे.
पाकिस्तानातील बलुचिस्तान आणि सिंध भागात आलेल्या पुरामुळे शेकडो एकर पिके नष्ट झाली आहेत. पाकिस्तान सरकार आधीच अफगाणिस्तानातून टोमॅटो आणि कांदा आयात करत आहे.
भारतात या वर्षी येणार मोठं संकट! प्रसिद्ध बाबा वेगांचे भाकीत, आजपर्यंतची भाकीत ठरलीत खरी
रविवारी लाहोरच्या बाजारात टोमॅटोचा भाव 500 रुपये किलो तर कांद्याचा भाव 400 रुपयांवर पोहोचला होता. लाहोरमधील घाऊक व्यापारी सांगतात की काही ठिकाणी घाऊक किंमती 100 रुपयांच्या आसपास आहेत, पण किरकोळ बाजारात जाताना त्याची किंमत चार-पाच पटीने वाढते.
घाऊक व्यापारी जवाद रिझवी यांचे म्हणणे आहे की, पूरस्थिती आणि घटते उत्पादन पाहता, जर लवकरच ठोस पावले उचलली गेली नाहीत, तर टोमॅटो आणि कांद्याचे भाव येथे 700 रुपये किलोपर्यंत पोहोचतील. जीवनावश्यक भाज्यांमध्ये समाविष्ट असलेल्या बटाट्याचे दरही 40 रुपयांवरून 120 रुपये किलो झाले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
Health Tips: सावधान! मंकीपॉक्सचा लहान मुलांना जास्त धोका; लक्षणे दिसल्यास घाबरू नका असे करा संरक्षण
अरे वा, भारीच की! शेतकऱ्यांचे वाचणार पैसे, देशात लवकरच लाँन्च होणार इलेक्ट्रिक ट्रॅक्टर
Published on: 30 August 2022, 02:43 IST