पश्चिम महाराष्ट्र म्हटलं की आठवते ते लाखों हेक्टरवरील कांद्याचे शेत, पश्चिम महाराष्ट्रातील जवळपास सर्वच जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन घेतले जाते. या विभागातील अनेक शेतकऱ्यांचे सर्व अर्थकारण कांदा पिकावर अवलंबून असते. मात्र असे असले तरी कांदा या नगदी पीक आला बेभरवशाचे पीक म्हणून संबोधले जाते. कांदा बेभरवशाचा का आहे याचाच प्रत्यय पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात आता समोर आला आहे.
महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात आता समोर आला आहे. जिल्ह्यातील खेड तालुक्याच्या भोसे व परिसरात मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादित केला जातो, मात्र असे असले तरी परिसरातील शेतकऱ्यांनी कांद्या ऐवजी फुल शेतीची कास धरली आहे आणि यातून शेतकर्यांना भरघोस उत्पन्न पदरी देखील पडत आहे. तालुक्याच्या पूर्वेला वसलेला भोसे परिसर गेल्या काही वर्षांपासून फुलशेतीसाठी राज्यात ख्याती प्राप्त झाला आहे. तालुक्याच्या या पूर्वेला असलेल्या परिसरात झेंडू अष्टर फुलांची मोठ्या प्रमाणात शेती केली जाऊ लागली आहे. परिसरातील फूल उत्पादक शेतकऱ्यांच्या मते, परिसरात जरी मोठ्या प्रमाणात फुलांची शेती होत असली तरीदेखील स्थानिक बाजारात फुलांना एवढी मागणी बनलेली नसते. मात्र जिल्ह्याच्या ठिकाणी परिसरातील फुलांना चांगली मागणी असते आणि चांगला दर देखील प्राप्त होतो. गेल्या अनेक वर्षांपासून तालुक्याच्या या भागातील शेतकरी निसर्गाच्या लहरीपणामुळे पुरता बेजार झाला आहे. अवकाळी अतिवृष्टी गारपीट ढगाळ वातावरण यामुळे परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून कांदा या मुख्य पिकाला मोठा फटका बसत असून, शेतकऱ्यांना कांदा लागवडीचा खर्च देखील काढणे मुश्किलीच होउन बसले होते. या हंगामात देखील परिसरातील शेतकऱ्यांना कांद्याने रडवले आहे म्हणून परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी फुल शेतीची कास धरली आहे. म्हणुन भोसे येथील शेतकऱ्यांनी अष्टर झेंडूची, शेवंतीची मागील काही महिन्यात लागवड सुरु केली आहे.
परिसरात फुलशेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी लाखो रुपयांची उलाढाल केल्याचे चित्र बघायला मिळत आहे. असे असले तरी, वातावरण बदलाचा फुल शेतीवर विपरीत परिणाम घडत असल्याचे सांगितले जात आहे. अवकाळी पाऊस, मध्यंतरी वाढलेली थंडी, दाट धुक्याची चादर, ढगाळ वातावरण आणि आता वातावरण निवळल्याने पडणारे कडकडीत ऊन यामुळे फुलशेतीला मोठा फटका बसत असून फुल उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झालेला आहे. मात्र या विपरीत परिस्थितीवर देखील मात करून भोसे परिसरातील शेतकऱ्यांनी फुलांची यशस्वी शेती केल्याचे दिसत आहे.
सध्या परिसरात रंगीबेरंगी फुलांनी शेती बहरल्याचे चित्र मनाला विशेष प्रसन्न करणारे आहे. फुलांच्या चार जुड्या पंचवीस रुपयांना विक्री होत आहेत, तर सुट्ट्या फुलांना 80 रुपये प्रति किलो असा बाजार भाव मिळत आहे. त्यामुळे फुल उत्पादक शेतकऱ्यांना चांगला नफा मिळत असल्याचे सांगितले जात आहे. परिसरातील फूल उत्पादक शेतकरी सध्या मिळत असलेल्या बाजार भावात समाधान व्यक्त करत आहेत.
Published on: 02 February 2022, 10:44 IST