News

Good News: राज्यात लवकरच गळीत हंगाम (Fall season) सुरु होत आहे. यातच आता ऊस (sugar cane) उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. कोल्हापुरातील शिरोळ येथील श्री दत्त शेतकरी सहकारी कारखान्याने ऊस उत्पादक सभासदांसाठी महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. (Shree Dutt Farmers Co-operative Factories)

Updated on 06 October, 2022 1:48 PM IST

Good News: राज्यात लवकरच गळीत हंगाम (Fall season) सुरु होत आहे. यातच आता ऊस (sugar cane) उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. कोल्हापुरातील शिरोळ येथील श्री दत्त शेतकरी सहकारी कारखान्याने ऊस उत्पादक सभासदांसाठी महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. (Shree Dutt Farmers Co-operative Factories)

आगामी हंगामासाठी कारखान्याच्या परंपरेनुसार एकरकमी एफआरपी (FRP) देण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला आहे. अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील (Ganpatrao Patil) यांनी दिली.

श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याची ५३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत व श्रीदत्त साखर कारखाना चॅरिटेबल ट्रस्टच्या १५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते.

शिंदे सरकार रेशन कार्ड धारकांची दिवाळी करणार गोड! फक्त 100 रुपयात मिळणार या वस्तू

कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील म्हणाले, साखरेला केंद्र शासनाने (Central Govt) प्रति क्विंटल तीन हजार सहाशे रुपये आधारभूत किंमत ठरवावी. कारखाना कार्यक्षेत्रातील १९ गावांमधील क्षारमुक्त प्रकल्प राबविण्यात आला असून यामध्ये तीन हजार एकर जमीन टिकाऊ झाली आहे.

क्षारमुक्त प्रकल्पासाठी केंद्र व राज्य शासनाकडून संबंधित शेतकऱ्यांना एकरी २४ हजार रुपये अनुदान प्राप्त झाले आहे. ऊर्जांकूर प्रकल्प हा लवकरच कर्जमुक्त होणार असून तो कारखान्याच्या मालकीचा झाल्यानंतर ऊस उत्पादक सभासदांना त्याचा लाभ मिळणार आहे. 

बापरे! कापायचं होतं बकरं मात्र गेला ३ वर्षांचा चिमुकला; गावावर शोककळा

सभासदांच्या विश्वासास पात्र राहून आणि कामगारांच्या पाठबळावर दत्त साखर कारखान्याने चौफेर प्रगती साधली आहे. यावर्षी कारखान्याकडे पुरेसा ऊस उपलब्ध होणार असून यंदाचा गळीत हंगामात जादा क्षमतेने गाळप करण्याचा मानस आहे.

पाटील म्हणाले, केंद्र शासनाने हंगामापूर्वी साखर निर्यातीबाबतचे धोरण (Export policy) जाहीर करणे आवश्यक आहे, वार्षिक सभेत कारखान्याचा शेअर १० हजार रुपयांवरून पंधरा हजार रुपये करण्याच्या ठरावास सभासदांनी मंजुरी दिली.

7 वा वेतन आयोगाबाबत जाणून घ्या 5 महत्त्वाच्या गोष्टी; होणार फायदा

English Summary: One-time FRP to be given by sugar factory in the state
Published on: 06 October 2022, 01:48 IST